शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

गॅरेजेस,शोरूम्सना पालिकेचे अभय

By admin | Updated: September 24, 2015 00:08 IST

ठाण्यातील अनेक रस्ते आणि पदपथ अडवून गॅरेज आणि शोरूमचा व्यवसाय थाटणाऱ्यांविरोधात ठाणे महापालिकेने दंडाच्या स्वरूपातील प्रस्ताव मंजूर केला आहे.

ठाणे : ठाण्यातील अनेक रस्ते आणि पदपथ अडवून गॅरेज आणि शोरूमचा व्यवसाय थाटणाऱ्यांविरोधात ठाणे महापालिकेने दंडाच्या स्वरूपातील प्रस्ताव मंजूर केला आहे. या प्रस्तावानुसार महापालिका आणि वाहतूक पोलीस संयुक्तरीत्या कारवाई करणार होते. परंतु, जवळजवळ अडीच वर्षे उलटून गेली असतानाही पालिकेकडूनच या प्रस्तावावर हव्या त्या प्रमाणात कारवाई न झाल्याने अथवा केवळ कारवाईचा फार्स केला जात असल्याने गॅरेजेस आणि वाहनांच्या शोरूम्सच्या चालकांनी अनेक फूटपाथ आणि सर्व्हिस रोड आपल्या ताब्यातच घेतला आहे.शहराच्या मध्यवर्ती भागात गॅरेज, स्पेअर पार्टची दुकाने अथवा कार डेकोरेशनची दुकाने थाटणाऱ्या दुकानदारांवर कोणाचाही वचक सध्या राहिलेला नाही. त्यांच्या अतिक्रमणावर वाहतूक पोलिसांकडून अधूनमधून कारवाईचा दट्ट्याही चालविला जातो. तर, महापालिकेकडून कधीतरी नोटीसचे कागदी घोडे नाचविले जातात. विशेष म्हणजे अशा दुकानांसमोर अधिकृत पार्किंगसाठी जागा रिकामी असताना सर्वसामान्य वाहनचालकाने तिथे पार्किंग करण्याचा प्रयत्न केला असता त्याला पोलिसांच्या विरोधाला सामोरे जावे लागते. कधी तर अशा वाहनचालकांना संबंधित दुकानातील कामगारांची धक्काबुक्कीही सोसावी लागते. याबाबतच्या अनेक तक्रारी आल्यानंतर अशा दुकानदारांवर नियंत्रण राखण्यासाठी सर्वपक्षीय नगरसेवकांचे एकमत झाले होते. त्यानुसारच रस्ते अडविणाऱ्या गॅरेजधारकांवर पाच हजार ते २० हजारांपर्यंत दंड आकारण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. तो आमलात आणण्याची तत्कालीन आयुक्त आर.ए. राजीव यांनी तयारी केली होती. याकामी ठाणे वाहतूक विभागाबरोबर समन्वय साधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी वाहतूक पोलिसांना आवश्यक असेल त्या वेळी मनुष्यबळ पुरविण्याचा निर्णयही पालिकेने घेतला असून गरज पडल्यास मोठ्या प्रमाणात महापालिकेच्या ताफ्यातील अतिक्र मणविरोधी पथकाचा बंदोबस्त उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला होता, पण प्रत्यक्षात काही झाले नाही. . महापालिकेचे अतिक्र मणविरोधी विभागाचे उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांच्याशी संपर्क साधला असता ठाणे महापालिकेचा गॅरेजविरोधातील कारवाईचा पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले. या गाड्यांवर एकत्रित कारवाई करण्यासाठी आमचा वाहतूक विभागाबरोबर समन्वय सुरू आहे. महापालिकेने वॉर्डनचा प्रस्ताव मंजूर केला असून त्याबाबतची कारवाई लवकरात लवकर पूर्ण केली जाईल. तसेच अत्यावश्यक वेळी वाहतूक विभागाला मनुष्यबळ लागल्यास महापालिका मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यास महापालिका बांधील असल्याचे त्यांनी सांगितले.महसुलात अर्धा वाटा या कारवाईसाठी महापालिकेकडून वाहतूक पोलिसांना दंडाच्या वसुलीसाठी पावती पुस्तक उपलब्ध करून दिले आहे. या कारवाईतून जमा होणाऱ्या महसुलापैकी ५० टक्के महापालिकेला आणि ५० टक्के रक्कम वाहतूक पोलीस विभागाला मिळणार आहे. वाहतूक पोलिसांनी या रकमेतून ब्रीथ अ‍ॅनालायझर, जॅमर अशा वाहतुकीला शिस्त लावणाऱ्या उपकरणांची खरेदी करणे अपेक्षित आहे. तसेच महापालिकेनेही त्यांच्याकडे जमा होणाऱ्या निधीतून वाहतुकीला शिस्त लावणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे.