शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय गोदामाचे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 02:52 IST

अन्नधान्याची नासाडी होऊ नये, ते एका ठिकाणी साठवणुकीची सुविधा पुरविण्यासाठी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाची स्थापना करून राज्यभरात सरकारी गोदामे बांधण्यात आली.

वैभव गायकर ।पनवेल : अन्नधान्याची नासाडी होऊ नये, ते एका ठिकाणी साठवणुकीची सुविधा पुरविण्यासाठी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाची स्थापना करून राज्यभरात सरकारी गोदामे बांधण्यात आली. पनवेलमध्ये अशा प्रकारची चार गोदामे असून, त्यातील मोडकळीस आलेली तीन गोदामे जमीनदोस्त करून नव्याने सुमारे ३००० मेट्रिक टन क्षमतेचे गोदाम बांधण्याकरिता निविदा काढण्यात आली असून त्यास २०१५ मध्ये मंजुरी देण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत गोदामाच्या बांधकामाला सुरु वातही झाली. मात्र दोन वर्षांपासून काम धीम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात भाडेतत्त्वावर वापरण्यात येणाºया गोदामासाठी सरकारच्या तिजोरीवर भुर्दंड पडत आहे.पनवेल तालुक्यात एकूण १९५ रास्त भाव धान्य दुकानदार आहेत. सर्वांना याच शासकीय गोदामातून धान्य पुरवठा केला जात होता. मात्र पनवेलमधील मार्केट यार्ड परिसरात असलेली गोदामे जीर्ण झाली होती. पावसाळ्यात त्यात पाणी शिरत असल्याने याच जागेवर नव्याने गोदाम बांधण्याला मंजुरी दिली. त्याअंतर्गत या तीन गोदामे जमीनदोस्त करून सुमारे १५५०.६४ चौरस मीटरचे नवे गोदाम बांधण्याची तरतूद केली. त्याची क्षमता ३००० मेट्रिक एवढी आहे. याकरिता सार्वजनिक बांधकाम खात्याने १ कोटी ९४ लाख १८ हजारांची अंतिम निविदा काढली असून काम हर्षद नंदकुमार गंदे या कन्स्ट्रक्शन कंपनीला सुमारे १ कोटी ६३ लाख १३ हजारांमध्ये मंजूर करण्यात आले. मात्र अतिशय धीम्या गतीने सुरू असलेल्या या कामामुळे तात्पुरत्या स्वरूपात साठवल्या जाणाºया गोदामासाठी लाखो रुपयांचा भुर्दंड सरकारला सोसावा लागत आहे.सध्याच्या घडीला कळंबोली येथील सीसीआय गोदामात पुरवठा विभागाच्या वतीने धान्य साठवले जाते. गोदामाचे महिन्याचे भाडे सुमारे २ लाख ३६ हजार ९८७ रु पये एवढे आहे. विशेष म्हणजे १ नोव्हेंबर २०१४ पासून पुरवठा विभागाने हे गोदाम भाडेतत्त्वावर घेतले असून त्याकरिता लाखो रु पये दरमहा मोजावे लागत आहेत. एकीकडे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मार्फत सुरू असलेल्या नवीन गोदामाचे अद्याप खांब देखील उभे राहिले नाही. त्यामुळे हे काम पूर्णत्वाला जाणार तरी कधी, हा प्रश्न उपस्थित होत आहे. हे काम जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत पुरवठा विभागाला भाड्याचे गोदाम वापरावे लागणार आहे. अद्याप ३२ महिने गोदामाचे भाडे सरकारला द्यावेच लागणार आहे. ३२ महिन्यांच्या भाडेतत्त्वाच्या रकमेचा हिशोब केल्यास ही रक्कम सुमारे ७५ लाखांच्या वर जात असल्याने वर्षभरात हा आकडा कोट्यवधींच्या घरात पोहोचेल. मात्र जोपर्यंत नवीन गोदामाचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत सरकारला लाखो रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.कळंबोली येथे असलेले गोदाम रास्त भाव धान्य दुकानदारांच्या दृष्टीने सोयीस्कर नसल्याने या दुकानदारांनाही फटका बसतो आहे. जितके पैसे आतापर्यंत भाडेतत्त्वासाठी खर्च करण्यात आले आहे, त्या रकमेत सर्व गोदामांची दुरुस्ती झाली असती, असे दुकानदारांचे म्हणणे आहे.सरकारने मंजूर केलेले काम पैसे अदा करूनही धीम्या गतीने होत आहे. पनवेलमधील सरकारी गोदाम वगळता आणखी तीन गोदामे तालुक्यात आहेत. पळस्पे, तळोजा आणि नेरे विभागात ही गोदामे आहेत. मात्र दुरवस्थेमुळे ती बंद आहेत. या गोदामांची दुरु स्ती केल्यास ती वापरता येतील, परिणामी सरकारचा भाडेतत्त्वापोटी होणारा खर्च वाचेल. मात्र सरकारच्या उदासीन धोरणामुळे गोदामे धूळ खात आहेत.