शहरं
Join us  
Trending Stories
1
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
2
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
5
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
6
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
7
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
9
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
10
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
11
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
12
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
13
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
14
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
15
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
16
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
17
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
18
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
19
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
20
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
Daily Top 2Weekly Top 5

कचरावेचक महिला करणार कचऱ्याचे वर्गीकरण

By admin | Updated: October 1, 2015 02:02 IST

शहरातून क्षेपणभूमीवर जाणाऱ्या कचऱ्याचे वजन, क्षमता, घनता कमी करण्याकरिता पालिका आगामी काळात वर्गीकरणावर अधिक लक्ष देणार आहे. त्या

प्रशांत शेडगे, पनवेल शहरातून क्षेपणभूमीवर जाणाऱ्या कचऱ्याचे वजन, क्षमता, घनता कमी करण्याकरिता पालिका आगामी काळात वर्गीकरणावर अधिक लक्ष देणार आहे. त्याकरिता कचरावेचक महिलांना या कामात सामावून घेतले जाणार असून त्यांचे सुरुवातीला सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी एजन्सी नियुक्त करण्याकरिता निविदा प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.२००८ मध्ये शहरात फक्त २२ टन कचरा निर्माण होत होता आता हे प्रमाण ४० टनावर पोहचले आहे. त्यामुळे उपलब्ध यंत्रणा कमी पडत असल्याने पुन्हा काही प्रमाणात कचऱ्याच्या विल्हेवाटीच्या प्रश्नाने डोके वर काढले होते. या संदर्भात प्रभावी उपाययोजना म्हणून पालिकेने ठराव पास करून निविदा पध्दतीने समीक्षा कन्स्ट्रक्शन या कंपनीचीकचरा गोळा करण्याकरिता नियुक्ती केली. कचरा उचलून तो क्षेपणभूमीवर टाकण्याचे काम ही एजन्सी करते. एजन्सीला सिडकोच्या धर्तीवर जितका कचरा उचलला जाईल तितकेच पैसे अदा करण्यात येत आहे. प्रति टन १,२५० रुपये पालिकेकडून एजन्सीला देण्यात येत आहेत. कॉम्पॅक्टरच्या साह्याने कचरा उचलण्यात येत आहे. परिणामी पनवेल शहरातील कचऱ्याचा प्रश्न बऱ्यापैकी निकाली निघाला आहे. कुठे कचरा पडून राहू नये त्याचबरोबर शहर कचरामुक्त राहावे याकरिता आरोग्य विभागाने ठेकेदाराच्या माध्यमातून हेल्पलाइन सेवा सुरू केली आहे. या नंबरवर फोन केल्यानंतर काही मिनिटात सफाई कामगार गाडीसह त्या ठिकाणी पोहचून कचरा उचलत आहेत. ही प्रक्रि या अधिक गतिमान आणि पारदर्शक व्हावी याकरिता मुख्याधिकारी मंगेश चितळे व अतिरिक्त मुख्याधिकारी चारु शीला पंडित यांच्या सूचनेनुसार समीक्षा कन्स्ट्रक्शनने घंटागाड्यांना ट्रॅकर लावले आहेत. त्याचा फायदा घनकचरा व्यवस्थापनाला होत आहे. असे असले तरी घनकचरा व्यवस्थापनामध्ये कचऱ्याचे वर्गीकरण करणे क्र मप्राप्त आहे.नागरिकांनी ओला आणि सुका कचरा वेगळा ठेवावा असे वारंवार आवाहन करून याबाबत म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे कचऱ्याचे वर्गीकरण न करता तो घंटागाडीत टाकला जातो. वास्तविक पाहता कचऱ्यातील काही वस्तूंचा पुनर्वापर करता येतो. या वस्तू बाहेर काढल्यानंतर कचऱ्याचे वजन बऱ्यापैकी कमी होते. ते करण्याकरिता पालिका प्रशासनाने आता वर्गीकरणावर लक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी नगराध्यक्षा चारुशीला घरत आणि आरोग्य सभापती गणपत म्हात्रे यांनी पुढाकार घेतला आहे.----------------पालिका देणार ओळखपत्रकचरावेचक महिला सोसायटी टू सोसायटी किंवा काही ठिकाणी घरोघर जावून त्या ठिकाणी जमा झालेल्या कचऱ्याचे वर्गीकरण करतील. ज्या वस्तूंचा पुनर्वापर होईल ती भंगारात विकली जाईल अशा वस्तू या महिला निवडतील, त्याची विक्र ी होवून जे पैसे येतील तेही त्याच घेतील असे नगरपालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. या महिलांना पालिका ओळखपत्र देणार आहे. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याकरिता आरोग्य विभाग दक्ष राहणार आहे.------------कचरावेचक महिलांचे गट करणारपनवेल शहरात किती कचरावेचक महिला आहेत, त्या कोेणत्या भागातील कचरा वेचतात, त्यांचा पत्ता त्याचबरोबर वैयक्तिक माहिती जमा करण्याकरिता पालिकेकडून खास एजन्सी नियुक्त करण्यात येणार आहे. सर्वेक्षण झाल्यानंतर संबंधित महिलांचे गट तयार करून त्यांना विभाग वाटून देण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.-----------------५० टक्के कचरा कमी होणारकचऱ्याचे वर्गीकरण झाल्यानंतर निवडण्यात आलेल्या वस्तू या पुनर्वापराकरिता वापरल्या जातील. त्यामुळे साहजिकच ५० टक्के कचरा कमी होईल त्यामुळे पालिकेचा वाहतूक त्याचबरोबर प्रक्रि या खर्च वाचणार आहे. त्याचबरोबर विल्हेवाट लावण्याकरिता फारशा अडचणी येणार नाहीत. ----------------याकरिता आपण निविदा प्रसिध्द केल्या आहेत. आज त्या भरण्याचा शेवटचा दिवस आहे. सध्या कचरावेचक महिला घाणीच्या ठिकाणी जावून कचरा वेचतात, ते त्यांच्या आरोग्यास हानिकारक आहे. म्हणून हे धोरण हाती घेतले असून त्यामुळे या महिला मुख्यप्रवाहात येतीलच, त्याचबरोबर सुका कचरा रोज उचलण्याची गरज भासणार नाही तसेच पालिकेचाही वाहतूक खर्च वाचेल. कचरावेचक महिलांना मानधन देण्याकरिता प्रशासन विचाराधीन आहे.- चारुशीला पंडित, अतिरिक्त मुख्याधिकारी, पनवेल नगरपालिका