शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

घणसोलीत उद्यानाच्या कामांना सुरुवात

By admin | Updated: March 20, 2017 02:16 IST

घणसोली कॉलनीच्या हस्तांतरणानंतर पालिकेने तिथल्या मूलभूत सुविधांना प्राधान्य देत विकासकामांना गती दिली आहे.

नवी मुंबई : घणसोली कॉलनीच्या हस्तांतरणानंतर पालिकेने तिथल्या मूलभूत सुविधांना प्राधान्य देत विकासकामांना गती दिली आहे. यानुसार रविवारी उद्यान सुशोभीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. यामुळे येत्या काळात विभागातील नागरिकांच्या गैरसोयी दूर होणार असून त्यांना विरंगुळ्यासाठी सोयी-सुविधांयुक्त उद्यान उपलब्ध होणार आहे. अनेक वर्षांपासून घणसोली विभागाच्या हस्तांतरणाचा रखडलेला प्रश्न डिसेंबर महिन्यात निकाली लागला आहे. पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सिडकोकडे पाठपुरावा करून घणसोली कॉलनीचा भाग ताब्यात घेतला आहे. हस्तांतरापूर्वी तिथल्या मूलभूत सुविधांच्या कामावरून दोन प्रशासनात कलगीतुरा सुरू होता. अखेर आहे त्या स्थितीत पालिकेने या नोडचे हस्तांतरण करून घेतले आहे. यामुळे विकासकामांवर खर्च होणारे सिडकोचे करोडो रुपये वाचले असून भविष्यात हा खर्च पालिकेला करावा लागणार आहे. हे आव्हान पेलत पालिकेने हस्तांतरणाची प्रक्रिया करून घेतल्यानंतर काही दिवसातच रस्त्याची डागडुजी केली होती. त्यानंतर उद्यानाच्या सुशोभीकरनाला सुरवात केली आहे. यानुसार सेक्टर ४ येथील पोलीस चौकीलगतच्या उद्यानासाठी आरक्षित भूखंडाच्या विकासाला सुरवात केली आहे. पहिल्या टप्प्याच्या या कामाची सुरवात रविवारी स्थानिक नगरसेविका उषा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी भाजपा जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरत, कृष्णा पाटील, अर्जुन गाडे, विश्वास कांबळे, संजय बांगर, आप्पा मुळे, हृषीकेश निगडे आदी उपस्थित होते. पहिल्या टप्प्याच्या या कामांतर्गत सदर उद्यानाचे सुशोभीकरण केले जाणार असून त्यासाठी पालिकेतर्फे १६ लाख रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे. यापूर्वी सिडकोच्या दुर्लक्षामुळे उद्यानासाठी आरक्षित असलेल्या या भूखंडाची दयनीय अवस्था झाली आहे. त्यात सुधार करून दुसऱ्या टप्याच्या कामांतर्गत उद्यानात झाडांची लागवड करून विरंगुळ्याचे साहित्य बसवले जाणार आहे. (प्रतिनिधी)