शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

बनावट कागदपत्रांच्या साहाय्याने फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 23:44 IST

कर्जासाठी दिलेल्या झेरॉक्सचा वापर; दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल

पनवेल : एखाद्या व्यक्तीला आपण पॅन किंवा आधार कार्डची झेरॉक्स सहज देतो; परंतु काम झाले नाही तर त्या झेरॉक्स प्रती परत घ्यायला आपण विसरतो. अशा प्रकारचा विसरभोळपणा किंवा निष्काळजीपणाचा फटका नेरुळ येथील एका रहिवाशाला बसला आहे. त्याने कर्जासाठी दिलेल्या झेरॉक्स प्रतीचा वापर करून दोन गुन्हेगारांनी त्यांच्या नावावर दोन गाड्या व मोबइलसाठी कर्ज घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ए. तांबोळी असे फसवणूक झालेल्या इसमाचे नाव असून, त्यांनी केलेल्या तक्रारीवरून पनवेल शहर पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नेरुळ येथे राहणारे ए. तांबोळी यांना मोबाइल घेण्यासाठी कर्ज हवे होते. त्यांनी आपल्या भावाच्या ओळखीच्या असलेल्या प्रवीण खडकबाण यांच्याकडे मोबाइलच्या फायनान्ससाठी आवश्यक कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती दिल्या; परंतु सिबिल स्कोअर कमी असल्याने त्यांना कर्ज मिळणार नाही, असे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे कर्जासाठी दिलेल्या कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती परत न घेताच तांबोळी निघून गेले. या संधीचा फायदा घेत प्रवीण खडकबाण व सोमनाथ वाघमारे यानी तांबोळी यांच्या आधार कार्डच्या झेरॉक्स प्रतीवर स्वत:चा फोटो लावून बनावट कागदपत्र तयार केले. या बनावट कागदपत्रांच्या अधारे त्यांनी तांबोळी यांच्या नावावर दोन दुचाकी व ५७ हजार रुपयांचा मोबाइल घेतला. यातील एका दुचाकीचे आरसी बुक एन. तांबोळी यांच्या नेरुळ येथील घरच्या पत्त्यावर गेल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर त्यांनी ताबडतोब पनवेल शहर पोलिसांमध्ये संबंधितांच्या विरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणी प्रवीण खडकबाण आणि सोमनाथ वाघमारे या दोघांना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना ५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीpanvelपनवेल