शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

वाहन परवान्यासाठी रांगेत चार तासांची ‘शिक्षा’

By admin | Updated: March 20, 2017 02:17 IST

वाहन चालविण्याचा परवाना काढण्यासाठी व नूतनीकरण करण्यासाठी आरटीओ कार्यालयात गेलेल्या नागरिकांचा अक्षरश: छळ

नवी मुंबई : वाहन चालविण्याचा परवाना काढण्यासाठी व नूतनीकरण करण्यासाठी आरटीओ कार्यालयात गेलेल्या नागरिकांचा अक्षरश: छळ सुरू आहे. पैसे भरणे व छायाचित्र काढण्यासाठी तब्बल चार तास रांगेत उभे राहावे लागत आहे. कार्यालयातील संगणक प्रणाली वारंवार बंद होत असून प्रशासनाच्या या कार्यपद्धतीविषयी नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. नवी मुंबई आरटीओ कार्यालयाविषयी नागरिकांमधील नाराजी दिवसेंदिवस वाढू लागली आहे. एपीएमसीमधील भाडेतत्त्वाने घेतलेल्या गाळ्यामध्ये कार्यालय सुरू असून येथे येणाऱ्या नागरिकांचा अक्षरश: छळ सुरू आहे. आरटीओ कर्मचारी नागरिकांना गुलामाप्रमाणे वागवत आहेत. शनिवारी वाहन परवाना काढण्यासाठी गेलेल्या नागरिकांना अक्षरश: चार तास उभे राहण्याची शिक्षा देण्यात आली. शिकाऊ वाहन परवाना काढण्यासाठी पैसे भरून घेण्यासाठी दोन तास ताटकळत उभे रहावे लागले. पैसे भरून घेणारे कर्मचारी अत्यंत धीम्या गतीने काम करत होते. शिवाय नागरिक रांगेत उभे असताना अनेक एजंट व राजकीय वशिलेबाजी घेवून आलेल्या नागरिकांचे पैसे थेट आतमधून भरून घेतले जात होते. अनेक एजंट थेट आतमध्ये जावून पैसे भरून घेत होते. पैसे भरून झाल्यानंतर फोटो काढण्यासाठी पुन्हा रांग लावावी लागली. वास्तविक पैसे भरल्यानंतर टोकन नंबर दिलेला असताना पुन्हा रांग लावण्याची गरजच नाही, पण टोकन नंबर फक्त नावालाच आहेत. कार्यालयाच्या मधल्या पॅसेजमध्ये रांग लावावी लागते. तेथे उभे राहण्यासाठीही जागा नाही. कार्यालयातील कागदांच्या गोणी त्याच परिसरामध्ये अस्ताव्यस्त टाकण्यात आल्या आहेत. नागरिकांना बसण्यासाठीही पुरेशी जागा नाही. तीव्र उकाड्यामुळे अनेकांना भोवळ येत असून नागरिकांचा जीव जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुपारी पावणेबारा वाजता रांग लावलेल्या नागरिकांना पैसे भरण्यासाठी व फोटो काढून घेण्यासाठी सायंकाळी पाच वाजले. यामुळे वाहन चालकाच्या परवान्यासाठीची परीक्षा न देताच परत फिरावे लागले. एवढा उशीर का होत आहे याविषयी विचारणा केली असता कर्मचारी सर्व्हर खराब आहे. संगणक बरोबर नाही अशी उत्तरे देत होते. अनेक वेळा नागरिकांना उद्धट उत्तरे दिली जात असल्याचे निदर्शनास आले. आरटीओ कार्यालयात नागरिकांना वाहन चालकाचा परवाना कसा मिळवायचा, कशी अपॉर्इंटमेंट घ्यायची याविषयी माहिती देण्याची काहीही यंत्रणा शिल्लक नाही. एजंटची मदत घेतल्याशिवाय येथील एकही काम होवू शकत नाही अशी स्थिती असून तक्रार कोणाकडे करायची असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. (प्रतिनिधी)