शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी...
4
$१ ची किंमत ₹९५.२०: डॉलरच्या समोर रुपया धाराशाही; पहिल्यांदाच विक्रमी नीचांकी स्तरावर भारतीय चलन
5
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
6
‘शिवाजी कोण होता?’ उर्दू आवृत्तीच्या २५ हजारांवर प्रतींची विक्री, पुस्तक पोहोचले पाकिस्तानात
7
९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल
8
स्मार्टफोन जगतात मोठी खळबळ: OnePlus आणि Realme चं मर्जर होणार? पाहा डिटेल्स
9
कोल्हापुरी ब्रँड 'प्राडा'ने स्वीकारला, नवीन चप्पल बाजारात; ३० जणांना इटलीत प्रशिक्षणाची संधी
10
अजब लग्नाची गजब कहाणी, ६६ वर्षांच्या आजोबांनी नातीच्या वयाच्या तरुणीसोबत लग्न 
11
भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी
12
Maharashtra Din 2026 Wishes: महाराष्ट्र आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा मराठमोळा सण
13
Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका! क्रूड प्रति बॅरल $१२० च्या पार, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
14
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
15
१ मे वैशाख पौर्णिमा: रात्री ९ ते १२ दरम्यान करा 'हा' सोपा उपाय; चंद्र देव पूर्ण करतील सर्व इच्छा!
16
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
17
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
18
"मुलगाच राहिला नाही, तर महाल काय कामाचा?"; अभिनेत्याच्या आईने सोडला ८० कोटींचा बंगला, राहते झोपडीत
19
VIDEO: धडकी भरवणारा अपघात! टायर फुटला, नियंत्रण सुटले अन् १५० फूट खोल दरीत गेली कार
20
लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् खुर्च्यांची फेकाफेक; लग्नात मटणावरून पाहुण्यांमध्ये मोठा राडा
Daily Top 2Weekly Top 5

नेरळ येथील शेतकऱ्याचे कुटुंबासह उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 02:01 IST

जमिनीवर कब्जा केल्याचा दावा : बनावट कागदपत्रे तयार के ल्याचा आरोप

कर्जत : तालुक्यातील खाडेपाडा आणि मानिवली येथे असलेल्या शेतीचा बेकायदेशीर कब्जा घेतल्याचा दावा करून कायदेशीर लढाई लढत असलेल्या शेतकरी कुटुंबाने आता आपल्या हक्कासाठी उपोषण सुरू केले आहे. आपल्या शेतामध्ये शेतकरी कुटुंबाने ४ नोव्हेंबरपासून उपोषण सुरू केले असून, नेरळ पोलिसांकडून उपोषणकर्त्यांची समजूत काढण्यात आली.

नेरळ येथे राहणारे गोविंद मालू डायरे यांच्या कुटुंबाला वारसाहक्कातून मानिवली आणि खाडेपाडा येथे जमीन आली. खाडेपाडा येथे असलेल्या जमिनी आहेत. या जमिनीपैकी खाडेपाडा येथील काही जमीन परस्पर विकली गेली असल्याचा या शेतकऱ्यांचा आरोप आहे. बनावट दस्तावेज बनवून ही जमीन हडप करण्यात आली, असा आरोप गोविंद मालू डायरे आणि कुटुंबाचा आहे. याबाबत त्यांनी रायगड जिल्हाधिकारी आणि सर्व शासकीय विभाग यांच्याकडे अर्ज करून दाद मागितली होती. त्यानंतर भूमी अभिलेखचे उपसंचालक यांच्या आदेशाने जागेवर जाऊन मोजणी केली होती. त्या मोजणी नंतर शासनाने कारवाई करून आपली जागा परत मिळावी, यासाठी अनेक मार्गाने न्याय मागण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे खाडेपाडा येथे असलेल्या आपल्या जमिनीवर आपल्या जागेत गोविंद मालू डायरे तसेच त्यांचे कुटुंबीय यांनी उपोषण सुरू केले. गोविंद मालू डायरे यांच्यासह चंद्रकांत मालू डायरे, वामन खंडू डायरे, चंद्रभागा मंगल डायरे आणि सविता डायरे यांनी हे उपोषण सुरू केले आहे.आपल्या कुटुंबावर अन्याय करणाºया भूमिलेख विभागाचे अधिकारी, भूमापक, जमिनीची विक्री करणाºया व्यक्तीवर आणि त्यांना मदत करणाºया व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी करीत आमरण उपोषणाची नोटीस गोविंद डायरे यांनी दिली होती. यापूर्वीही डायरे यांनी उपोषण केले होते. मंगळवारी सायंकाळी उपोषणकर्ते यांची नेरळ पोलीस ठाण्याचे अतिरिक्त कारभार असलेले सहायक पोलीस निरीक्षक पी. टी. काळे यांनी भेट घेऊन माहिती घेतली. त्यानंतर कर्जत येथील भूमिअभिलेख कार्यालयाचे अधिकारी वाय. एस. शेळके यांनी उपोषणकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेत मोजणी नकाशानुसार पॉइंट टाकून देण्याची तयारी दाखवली; पण आकारफोड होत नाही तोवर आपण उपोषण सोडणार नाही आणि दोषी कर्मचाºयांवर कारवाई होत नाही तोवर आपले आंदोलन सुरू राहील, असा निर्धार व्यक्त केला. 

टॅग्स :FarmerशेतकरीKarjatकर्जत