शहरं
Join us  
Trending Stories
1
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
4
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
5
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
6
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
7
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
9
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
10
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
11
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
12
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
13
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
14
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
16
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
17
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
18
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
19
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
20
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
Daily Top 2Weekly Top 5

सायबर गुन्हे रोखण्यासाठी तज्ज्ञांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 02:39 IST

मुंबई, ठाण्यापेक्षा नवी मुंबईमध्ये आयटी कंपन्यांची संख्या व सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. जेएनपीटीमधील जीटीआय कंपनी

नवी मुंबई : मुंबई, ठाण्यापेक्षा नवी मुंबईमध्ये आयटी कंपन्यांची संख्या व सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. जेएनपीटीमधील जीटीआय कंपनी, रिलायन्स जिओ व खुद्द पोलिसांचे अधिकृत संकेतस्थळ हॅक झाल्यानंतर पोलीस यंत्रणा अधिक दक्ष झाली असून, या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी आयटी तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे.जुलै महिन्यामध्ये नवी मुंबई सायबर गुन्ह्यांनी हादरली. देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असलेल्या रिलायन्सच्या जिओ कंपनीचा डाटा हॅक करण्यात आला. याविषयी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला शिताफीने अटक केले. आरोपीने पैसे मिळविण्यासाठी किंवा कंपनीचे नुकसान करण्यासाठी हा गुन्हा केला नसला, तरी मोठ्या उद्योगसमूहाची माहितीही सुरक्षित नसल्याचे त्यामुळे सिद्ध झाले. दुसºया गुन्ह्यामध्ये देशातील तिसºया क्रमांकाचे मोठे बंदर असलेल्या जेएनपीटीमधील जीटीआय कंपनीचे २७० संगणक व लॅपटॉप हॅक करण्यात आले. कंपनीचा सर्व कारभार ठप्प होऊन गेला. या गुन्ह्यामध्ये हॅकर्सने कंपनीकडे खंडणीची मागणी केली असल्यामुळे कंपनी व्यवस्थापनाने न्हावा-शेवा पोलीस स्टेशनमध्ये आयटी अ‍ॅक्ट व खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. तिसºया घटनेमध्ये हॅकर्सने थेट नवी मुंबई पोलिसांना दणका दिला. एकाच आठवड्यात दोन वेळा पोलिसांचे अधिकृत संकेतस्थळच हॅक करण्यात आले. पोलिसांच्या संकेतस्थळावर काहीही गुप्त माहिती नसली, तरी कायद्याच्या रक्षणकर्त्यांचे संगणक व संकेतस्थळही सुरक्षित नसल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.सायबर गुन्हे रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. जीटीआय कंपनीचे संगणक हॅक केल्याच्या गुन्ह्याचा तपास सायबर सेलकडे हस्तांतर करण्यात आला आहे; परंतु अद्याप या गुन्ह्याचा उलगडा झालेला नाही. नवी मुंबई पोलिसांचे संकेतस्थळ हॅक करणाºया आरोपीचाही अद्याप शोध लागलेला नाही. पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की, नवी मुंबईमध्ये आयटी उद्योग वाढत आहेत. सायबर गुन्ह्यांची संख्याही वाढत आहे. नवी मुंबईमधील गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी स्वतंत्र सेल तयार केला आहे. आयटी सेलमधील पोलीस अधिकाºयांसोबत या क्षेत्रामधील तज्ज्ञांचेही गुन्ह्यांचा उलगडा करण्यासाठी सहकार्य घेतले जात आहे. आयटी उद्योगांमधील तज्ज्ञ व्यक्तींच्या मदतीने गुन्ह्यांचा उलगडा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. याशिवाय राज्याच्या आयटी सेलचीही वेळोवेळी मदत घेतली जात आहे. नागरिकांनीही याविषयी आवश्यक ती काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.