अभियंत्यास पोलीस कोठडी

By Admin | Updated: November 2, 2014 01:04 IST2014-11-02T01:04:01+5:302014-11-02T01:04:01+5:30

सार्वजनिक बांधकाम विभागातील लाचखोर कार्यकारी अभियंता भुद्धेश पुंडलिक रंगारी याला 6 नोव्हेंबर्पयत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Engineer Police Cell | अभियंत्यास पोलीस कोठडी

अभियंत्यास पोलीस कोठडी

नवी मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभागातील लाचखोर कार्यकारी अभियंता भुद्धेश पुंडलिक रंगारी याला 6 नोव्हेंबर्पयत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याच्या घरात 1 कोटी 28 लाख 65 हजार रुपयांची रोकड सापडली असून, पोलिसांनी  त्याच्या बेहिशोबी मालमत्तेचा शोध सुरू केला आहे. 
नवी पनवेलमधील भिंगारी कार्यालयामध्ये 73 हजार रुपयांची लाच घेताना शुक्रवारी रंगारीला अटक केली होती. त्याच्या घरातही पैशाचे घबाड सापडले होते. या वर्षातील लाचलुचपत विभागाची ही सर्वात मोठी कारवाई आहे. लाचलुचपत विभागाने आरोपीस आज न्यायालयात हजर केले असता त्याला 6 नोव्हेंबर्पयत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.  आरोपीच्या बँक लॉकरची माहिती पोलिसांना मिळाली आहे. (प्रतिनिधी)

 

Web Title: Engineer Police Cell