शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
3
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
4
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
5
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
6
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
7
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
8
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
9
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
10
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
11
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
12
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
13
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
14
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
15
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
16
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
17
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
18
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
19
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
20
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
Daily Top 2Weekly Top 5

उलवे टेकडीच्या खोदकामास पावसाचा व्यत्यय

By admin | Updated: July 6, 2017 06:45 IST

आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मार्गात प्रमुख अडथळा ठरणाऱ्या उलवा टेकडीच्या खोदकामाला गेल्या महिन्यापासून सुरुवात करण्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मार्गात प्रमुख अडथळा ठरणाऱ्या उलवा टेकडीच्या खोदकामाला गेल्या महिन्यापासून सुरुवात करण्यात आली आहे. त्यासाठी टेकडीवर सुरुंग पेरून स्फोट घडविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. परंतु गेल्या सहा दिवसांपासून पावसाचा टेकडी उत्खननाच्या कामात व्यत्यय आला आहे. सुरुंग पेरण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचत असल्याने स्फोटके भरताना अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे ही प्रक्रिया रखडल्याचे संबंधित विभागाकडून सांगण्यात आले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मार्गातील सर्व अडथळे दूर झाले आहेत. आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार सिडकोने विमानतळपूर्व कामे हाती घेतली आहेत. यात उलवे टेकडीची उंची कमी करणे, गाढी नदीचा प्रवाह बदलणे, उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या भूमिगत करणे आदी प्रमुख कामांचा सामावेश आहे. तब्बल दोन हजार कोटी रुपयांची कामे सुरू करण्यात आली आहेत. यात उलवे टेकडीच्या सपाटीकरणाचे काम अत्यंत जोखमीचे व तितकेच महत्त्वाचे आहे. या टेकडीची उंची ९५ मीटर इतकी आहे. विमानतळासाठी ती ८६ मीटर इतकी कमी केली जाणार आहे. त्यासाठी स्फोटकांचा वापर केला जात आहे. झारखंड येथील सीआयएमएफआर या तज्ज्ञ संस्थेच्या देखरेखीखाली टेकडीच्या उत्खननाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यानुसार प्राथमिक स्तरावर टेकडीवर सुरुंग पेरण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. अलीकडेच टेकडीवर स्फोट घडवून या कामाची चाचणी घेण्यात आली. दरम्यान, प्रायोगिक तत्त्वावर आतापर्र्यंत २७ स्फोट घडविल्याची माहिती संबंधित विभागाकडून देण्यात आली आहे. असे असले तरी पावसामुळे या कामात व्यत्यय आला आहे. पहिल्या टप्प्यात जवळपास १३00 सुरुंग पेरले जाणार आहेत. त्यासाठी टेकडीवर खड्डे खोदण्यात आले आहेत. परंतु त्यात पावसाचे पाणी साचल्याने स्फोटके पेरण्याच्या कामात अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे स्फोटके पेरण्याचे काम थांबविण्यात आले आहे. मात्र पावसाची उघडीप होताच या कामाला गती दिली जाईल, असे संबंधित विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. प्राथमिक स्तरावर कामझारखंड येथील सीआयएमएफआर या तज्ज्ञ संस्थेच्या देखरेखीखाली टेकडीच्या उत्खननाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यानुसार प्राथमिक स्तरावर टेकडीवर सुरुंग पेरण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.पहिल्या टप्प्यात जवळपास १३00 सुरुंग पेरले जाणार आहेत.