शहरं
Join us  
Trending Stories
1
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
2
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
3
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
4
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
5
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
6
कान्समध्ये अवतरली जणू स्वप्नातील परी! मिंट-ग्रीन गाऊनमध्ये आलिया भट्टचा 'प्रिन्सेस लूक' व्हायरल
7
Vastu Shastra: घरात पैसे टिकत नाहीत? मग चुकूनही 'या' दिशेला ठेवू नका तुमची तिजोरी!
8
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
9
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
10
Gold Import: सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या तिजोरीवर पडला मोठा भार, सोन्याने भारताची चिंता का वाढवलीये?
11
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
12
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
13
अनधिकृत बाइक टॅक्सी ॲप्सवर कारवाईचे आदेश; प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राइम विभागाला पत्र
14
देश प्रथम! PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; मंत्री शंभूराज देसाईंचा लंडन-पॅरिस दौरा रद्द
15
भाजप नेत्यांनी ५० गाड्यांच्या ताफ्यासह भोपाळला काढली रॅली, PM मोदींचं आवाहन नेते दुसऱ्याच दिवशी विसरले!
16
'या' Infra कंपन्यांची लागली लॉटरी! ११ हजार कोटींचा प्रोजेक्ट मिळताच स्टॉक सुस्साट, हाती आला रेल्वे-हायवेचा प्रोजेक्ट
17
Mumbai Crime: ब्युटीशियन मनाली यांची अंबोलीत हत्या; अवघ्या दोन तासांत मित्रास घाटकोपरमध्ये केले अटक
18
संध्याकाळपर्यंत कुणी ओळखत नव्हता, एका रात्रीत बनला हीरो, कोण आहे माधव तिवारी?  
19
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जि. प.त भाजप,बविआ आघाडी

By admin | Updated: February 17, 2015 22:48 IST

भाजपाने बविआचा बिनशर्त पाठिंबा घेऊन जिल्हा परिषदेच्या सर्व पदांचा ताबा घेण्याचा चंग बांधला आहे. तर या निवडणूकीत आमची युतीच नव्हती अशी भूमिका सेनेने अखेर घतली आहे़

पालघर : जिल्हा परीषदेच्या अध्यक्षपदासाठी बुधवारी १८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपा सेना युतीत फूट पडल्याने भाजपाने बविआचा बिनशर्त पाठिंबा घेऊन जिल्हा परिषदेच्या सर्व पदांचा ताबा घेण्याचा चंग बांधला आहे. तर या निवडणूकीत आमची युतीच नव्हती अशी भूमिका सेनेने अखेर घतली आहे़
ठाणे जिल्हयाच्या विभाजना नंतर पालघर जिल्हा परीषदेची निर्मिती करण्यांत आल्या नंतर पालघर नव्या जिल्हा परिषद व आठ पंचायत समित्यांच्या निवडणुका २८ जानेवारी रोजी घेण्यांत आल्या असून ३० जानेवारीच्या मतमोजणीत पालघर जिल्हा परिषदेच्या ५७ जागा पैकी २१ जागावर भाजपाने वर्चस्व प्रस्थापित केले असून शिवसेनेचे १५ सदस्य तर बहुजन विकास आघाडीचे १० सदस्य असून मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीने ५ जागा हस्तगत केल्या आहेत़ तर राष्ट्रवादीचे ४ सदस्य व कॉगें्रस व अपक्ष प्रत्येकी १ असे संख्याबळ आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपा व शिवसेनेत जागा वाटपा वरून बोलणी फिसकटल्याने दोन्ही पक्षांनी विरोधात उमेदवार उभे करून निवडणुका लढविल्या़ एकाही पक्षाला बहुमत प्राप्त करता न आल्याने किमान पदाधिकारी निवडीच्या वेळी तरी युतीत समेट घडून येईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यांत येत होती़ मात्र निवडणूकीच्या आदल्या सायंकाळ पर्यंत भाजपा सेनेत समेटा ऐवजी बेबनाव दिसत होता. जिल्हा परीषद अध्यक्षपदाच्या या निवडणुकीत भाजपा मोठा पक्ष म्हणून अध्यक्षपदावरील भाजपाचा दावा सेनेने मान्य केला असला तरी उपाध्यक्षपद व स्टॅडींग समिती व बांधकाम समितीचे चेअरमनपद शिवसेनेला मिळावे यासाठी गेले पांच दिवस वाटाघाटी सुरू होत्या़ त्या निष्फळ ठरल्याने शेवटी कमळाबार्इंनी बहुजन विकास आघाडीची म्होतूर लावणे पसंत केले. त्यामुळे भविष्यात जि.प.त खडाजंगी सुरूच राहण्याची चिन्हे आहेत.

४ जि.प.तील सत्ता वाटपाचा मुद्दा अखेर राज्य पातळीवरील नेत्याकडे नेण्यांत आला मात्र तेथेही आज सांयकाळ पर्यंत निर्णय झाला नाही़ भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे़ पालघरचे पालक मंत्री विप्णु सावरा व खासदार चिंतामण वनगा़ जिल्हाध्यक्ष बाबा काठोळे़ तर सेना नेते व ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे खासदार अनिल देसाई व सेनेचे प्रदेश कार्यालयीन प्रमुख मिलींद नार्वेकर यांच्या १६ तारखेच्या तसेच दोनही पक्षांच्या आजच्या बैठकीत देखील काही निष्पन्न झाले नाही. तर आमची वरीष्ठ पातळीवर बोलणी सुरू असल्याचे दोन्ही पक्ष म्हणत होते.