शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
3
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
4
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
5
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
6
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
7
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
8
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
9
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
10
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
11
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
12
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
13
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
14
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
15
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
16
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
17
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
18
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
19
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
20
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
Daily Top 2Weekly Top 5

अशुद्ध दिशादर्शक फलकांची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 03:39 IST

शहरात एमएमआरडीएने लावलेले दिशादर्शक फलक सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या फलकामध्ये शहरातील महत्त्वाच्या ठिकाणाचा चुकीचा उल्लेख केला

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : शहरात एमएमआरडीएने लावलेले दिशादर्शक फलक सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या फलकामध्ये शहरातील महत्त्वाच्या ठिकाणाचा चुकीचा उल्लेख केला असून या नावांमध्ये प्रचंड अशुद्ध लेखन असल्याने सोशल मीडियावर टीकेची झोड उठली आहे. पनवेल महापालिकेवर या फलकावरून टीका होत असून संबंधित फलक हे एमएमआरडीएने लावले असल्याचा खुलासा पनवेल महानगर पालिका अधिकाऱ्यांनी केला आहे. फलकामध्ये बावन बंगला रोड जवळ लावलेल्या पनवेल न्यायालयाचा ‘पनवेल न्यायाल्य’ असा उल्लेख करण्यात आला आहे. बस स्थानकाचा पनवेल बस ‘स्थानकोड’, जुना ठाणा नाका रोडवरील ज्येष्ठ नागरिक सभागृहाचा उल्लेख ‘जेष्ठ नागरिक सभाग्रह’, दिवाळे तलावाचा देवाले ‘तळाव’ अशाप्रकरच्या अशुद्ध लेखनाच्या हास्यास्पद चुका असल्याने संबंधित फलक सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहेत. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आदी सोशल मीडियावरील साइटवर हे फलक शेअर केले जात आहेत. पनवेल शहरात नुकतेच एमएमआरडीएच्या वतीने चाळीस कोटी रु पये खर्चून रस्ते काँक्र ीटीकरण केले आहेत. मात्र रस्त्यांची जेवढी चर्चा झाली नाही, चर्चा फलकांची सुरू आहे. एकीकडे मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त होण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू असताना शासनाची यंत्रणा असलेल्या एमएमआरडीएने अशा चुका केलेल्या योग्य नसल्याची प्रतिक्रि या सोशल मीडियावर उमटत आहे.