शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

दिबांना मरणोत्तर ‘महाराष्ट्र भूषण’ देण्याची मागणी

By admin | Updated: June 28, 2017 03:26 IST

लोकनेते दि. बा. पाटील यांना राज्य शासनाने यंदाचा ‘मरणोत्तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ घोषित करावा, त्यांनी १९८४मध्ये

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : लोकनेते दि. बा. पाटील यांना राज्य शासनाने यंदाचा ‘मरणोत्तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ घोषित करावा, त्यांनी १९८४मध्ये शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी दिलेल्या स्फूर्तिदायक लढ्यावरील विस्तृत लेखाचा महाराष्ट्र शासनाने पाठ्यपुस्तकात समावेश करावा, अशी मागणी पनवेल संघर्ष समितीने राज्याचे आणि सांस्कृतिकमंत्री यांच्याकडे निवेदनातून केली आहे. यासंदर्भात त्यांची प्रत्यक्ष भेट घेण्यात येईल, तसेच राज्यातील विविध पक्षांचे अध्यक्ष, आमदार, खासदारांना शिफारस करण्याची विनंतीही करण्यात आली आहे.नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनावणे व पनवेल महापालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांना प्रत्यक्ष भेटून दिलेल्या निवेदनातून लोकनेते दि. बा. पाटील यांच्या कर्तृत्वाची दखल घेऊन त्यांच्या नावे ‘समाजभूषण पुरस्कार’ सुरू करण्यासोबत विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती सुरू करण्याची महत्त्वपूर्ण मागणी केली आहे. तसेच दोन्ही महापालिकांनी त्यांच्या परिक्षेत्रात दिबांचा पुतळा उभारावा, असेही सूचविण्यात आले आहे.शिष्टमंडळात अध्यक्ष कांतीलाल कडू, उपाध्यक्ष विजय काळे, ज्येष्ठ सदस्या माधुरी गोसावी, पराग बालड, अ‍ॅड. संतोष सरगर, मच्छिंद्र नाईक, मंगल भारवड, कुंदा गोळे, भारती जळगावकर, रुपाली शिवथरे, वैशाली सुर्वे आदींचा समावेश होता.