स्कूल व्हॅनच्या धडकेत मुलाचा मृत्यू

By Admin | Updated: January 10, 2016 00:36 IST2016-01-10T00:36:04+5:302016-01-10T00:36:04+5:30

भरधाव स्कूल व्हॅनच्या धडकेत तीन वर्षीय मुलाच्या मृत्यूची घटना कोपरखैरणेत घडली आहे. अपघातानंतर व्हॅनचालकाने घटनास्थळावरून पळ काढल्याने पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

The death of the child in the heart of the school van | स्कूल व्हॅनच्या धडकेत मुलाचा मृत्यू

स्कूल व्हॅनच्या धडकेत मुलाचा मृत्यू

नवी मुंबई : भरधाव स्कूल व्हॅनच्या धडकेत तीन वर्षीय मुलाच्या मृत्यूची घटना कोपरखैरणेत घडली आहे. अपघातानंतर व्हॅनचालकाने घटनास्थळावरून पळ काढल्याने पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
शुक्रवारी रात्री कोपरखैरणे सेक्टर ४, ए येथे तीन वर्षीय युवराज सरोदे हा आजीसोबत लगतच्या उद्यानात जाण्यासाठी रस्ता ओलांडताना भरधाव स्कूल व्हॅनची त्याला धडक लागली. या अपघातात जखमी युवराजला वाशीतील पालिका रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. युवराज हा घणसोली सेक्टर ६ येथील राहणारा असून, तो कोपरखैरणेत मामाकडे आला होता. सदर अपघात प्रकरणी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात स्कूल व्हॅनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र अपघातानंतर त्याने पळ काढल्याने पोलीस त्याचा शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: The death of the child in the heart of the school van