शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
3
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
4
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
6
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
9
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
10
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
11
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
12
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
13
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
14
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
15
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
16
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
17
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
18
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
19
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
20
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
Daily Top 2Weekly Top 5

घणसोलीत अपहरण नाट्य

By admin | Updated: March 15, 2017 02:43 IST

खेळण्यासाठी घराबाहेर गेलेली दोन मुले अज्ञाताने पळवून नेल्याचा संशयित प्रकार मंगळवारी सकाळी घणसोलीत घडला.

नवी मुंबई : खेळण्यासाठी घराबाहेर गेलेली दोन मुले अज्ञाताने पळवून नेल्याचा संशयित प्रकार मंगळवारी सकाळी घणसोलीत घडला. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात पालकांमध्ये भीती निर्माण झाली होती. अखेर नागरिकांनी दिवसभर शोधमोहीम राबवल्यानंतर दोन्ही मुले एका नातेवाइकाकडे आढळून आली. त्या नातेवाईक मुलीने पालकांना कसलीही कल्पना न देताच त्या मुलांना सोबत नेले होते.मागील काही महिन्यांपासून घणसोलीत लहान मुलांना पळवून नेल्याच्या अफवा पसरत आहेत. अशातच मंगळवारी सकाळी घडलेल्या प्रकाराने परिसरातील पालकांचा थरकाप उडाला. सिम्प्लेक्स येथील ई विंगमधून ८ ते १० वर्षांची दोन मुले घराबाहेर खेळत असताना बेपत्ता झाली. हा प्रकार त्यांच्या पालकांच्या निदर्शनास येताच त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने बेपत्ता मुलांच्या शोधकार्याला सुरवात केली. काही वेळातच संपूर्ण परिसरात या प्रकाराची चर्चा सुरू झाली. नागरिकांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता, एक मुलगी त्या दोन मुलांना घेऊन जाताना दिसून आली; परंतु त्या मुलीचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता, यामुळे प्रकरणाचा वेळीच उलगडा होऊ शकला नाही. अखेर पालकांनी पोलिसांकडे धाव घेवून बेपत्ता मुलांच्या शोधासाठी त्यांचीही मदत घेतली. याच वेळी त्या दोन अल्पवयीन मुलांच्या शोधात काही जण घणसोली गावात गेले असता, त्याठिकाणी दोन्ही मुले आढळून आली. सीसीटीव्हीमध्ये दिसणारी मुलगीदेखील त्यांच्यासोबत होती. या मुलीकडे चौकशी केली असता, ती त्यांचीच नातेवाईक असल्याचे उघड झाले. ती सिम्प्लेक्स परिसरात आली असता, सोबत जाताना या दोन अल्पवयीन मुलांना सोबत घेऊन गेली होती; परंतु त्यांच्या पालकांना तिने याची कल्पना दिली नव्हती. यामुळे दोन्ही मुलांचे अपहरण झाल्याच्या शक्यतेने पालक चिंतित झाले होते. (प्रतिनिधी)