शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

गोविंदा रे गोपाळा ! राज्यभरात दहीहंडीचा उत्साह

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2017 13:40 IST

मुंबई, दि. 15 - यंदा स्वातंत्र्य दिन आणि दहीहंडी उत्सव एकाच दिवशी आल्याने, चाकरमानी मुंबईकरांना थरांचे स्वातंत्र्य अनुभवायला मिळत ...

मुंबई, दि. 15 - यंदा स्वातंत्र्य दिन आणि दहीहंडी उत्सव एकाच दिवशी आल्याने, चाकरमानी मुंबईकरांना थरांचे स्वातंत्र्य अनुभवायला मिळत आहे. देशभरात स्वातंत्र्यदिनाचा उत्साह असताना, गोविंदांचा उत्साहदेखील शिगेला पोहोचला आहे. सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या कचाट्यातून सुटलेला दहीहंडी उत्सव, यंदा जोश-जल्लोषात साजरा करण्यासाठी गोविंदा पथके सज्ज झाली आहेत. मागील काही वर्षांत न्यायालयीन निर्बंधांमुळे संभ्रमावस्थेत असलेल्या उत्सवावर भीतीचे सावट दिसून आले. मात्र, यंदा गोविंदा पथके सर्व निर्बंध झुगारून ‘करून दाखविणारच’ या निर्धाराने मैदानात उतरताना दिसत आहेत. काळाचौकी, लालबाग, परळ, दादर, वरळी परिसरांमध्ये तर दहीहंडी फोडायला सुरुवातदेखील झाली आहे. 

उच्च न्यायालयाने बालगोविंदाचे वय कमी करून १८ वरून १४ केले आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निर्देशांचे पालन गोविंदा पथके करणार, याकडे पोलिसांचे बारकाईने लक्ष आहे.

दादर फुलमार्केटमधील दहीहंडी (फोटो - दत्ता खेडेकर)

उत्सवादरम्यान सूचनांचे पालन करण्याचे आवाहन दहीहंडी समन्वय समितीने व्हिडीओच्या माध्यमातून केले आहे. तर याचिकाकर्त्या स्वाती पाटील यांनीही थरांची उंची गाठताना कुटुंबाचा विचार करा, असे आवाहन केले. 

ठाणे - मनसेने आयोजित केलेली दहीहंडी 

दहीहंडी आणि स्वातंत्र्यदिन साजरा करणारा गोविंदा

पोलिसांचे सुरक्षा कवच : मुंबई पोलीस दलातील ३५ हजार अधिकारी आणि जवान, शहरातील अतिसंवेदनशील ठिकाणी तैनात राहतील. केंद्रीय व राज्य राखीव बलाच्या १५ तुकड्या, एटीएस, शीघ्रकृती दल तैनात असून अतिरेकी कारवायांच्या शक्यतेतून गुप्तचर तपास यंत्रणाकार्यरत असतील, असे कायदा व सुव्यवस्थाचे प्रमुख सहायुक्त देवेन भारती यांनी सांगितले होते. ड्रोनसह ५ हजार सीसीटीव्हींचा वॉच असणार आहे.

यंदा १० थर : माझगाव ताडवाडी गोविंदा पथक आणि जय जवान गोविंदा पथकाने नऊ थरांचा विक्रम केला आहे. यंदा याच्याही एक पाऊल पुढे जात दहा थर लागणार आहेत. उपनगराचा राजा मानल्या जाणा-या जय जवान गोविंदा पथकाने या विक्रमासाठी कसून तयारी केली आहे. याशिवाय दादरमधील कलाकारांचा दहीहंडी मुंबईकरांसाठी औत्सुक्याचा विषय आहे.

काळाचौकीत गोविंदांसाठी सेफ्टी बेल्ट

सेफ्टी बेल्टसह रूग्णवाहिका आणि अन्य सुरक्षा साधनांसह दहिकाला उत्सवात माझगाव ताडवाडी गोविंदा पथकाने 7 थरांची सलामी देत काळाचौकीवासियांची वाहवा मिळवली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवडी विधानसभेतर्फे हा दहीकाला उत्सव आयोजित करण्यात आला होता.  विशेष बाब म्हणजे, काळाचौकीतील भगतसिंह मैदानात गोविंदांकडून मनोरे रचतेवेळी मनसे नेते बाळा नांदगावकर आणि शिवसेना नगरसेवक यशवंत जाधव हे उत्सवानिमित्त पक्षीय मतभेद विसरून एकत्रितपणे गोविंदांना प्रोत्साहन देताना दिसले. 

नवी मुंबई जुईनगर सेक्टर 25 मधील अजिंक्य  सोसायटीमध्ये संघर्ष मित्र मंडळातील 13 वर्षीय मुलीने दहीहंदी फोडली.

 

टॅग्स :Dhahi Handiदहीहंडी