शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

खरेदीसाठी गणेशभक्तांची अलोट गर्दी

By admin | Updated: September 14, 2015 03:50 IST

गणरायांचे आगमन अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपले असून त्यापूर्वीच्या आजच्या शेवटच्या रविवारी गणरायांच्या मूर्तीपासून ते मखरापर्यंत आणि पूजा साहित्य

वसई/विरार/पालघर : गणरायांचे आगमन अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपले असून त्यापूर्वीच्या आजच्या शेवटच्या रविवारी गणरायांच्या मूर्तीपासून ते मखरापर्यंत आणि पूजा साहित्य ते सजावटीच्या सामग्रीपर्यंत खरेदी करण्यासाठी गणेशभक्तांनी अलोट गर्दी केली होती. दुकानात आणि बाजारपेठेच्या रस्त्यांवर वावरण्यासही जागा नव्हती. अनेक दुकानांत ग्राहकांना शिरण्यासाठीदेखील प्रतीक्षा करावी लागत होती.रविवारी बाजारपेठेत अशी गर्दी होणार, याचा अंदाज दुकानदारांनाही होता. त्यामुळे त्यांनीही तशी पूर्वतयारी केली होती. बाजारपेठेतील या गर्दीमुळे ग्राहकांना कुठेही पार्किंगसाठी जागा उपलब्ध नव्हती. त्यामुळे अनेकांनी खूप लांबवर आपली वाहने पार्क करून पायीच खरेदी करणे पसंत केले. सगळ्यांना पावसाची भीती होती. परंतु, तुरळक सरीवगळता पावसानेही आज फारशी हजेरी न लावल्याने बाजारपेठेत मोठा उत्साह होता. मखरांचा बाजार प्रचंड तेजीत होता. थर्माकोल, कृत्रिम फुले, फोल्डिंगची मखरे आज तडाखेबंदी विकली गेलीत. तर, सजावटीसाठी लागणाऱ्या विजेच्या माळा आणि अन्य सामग्री यांच्याही बाजारपेठा भरपूर तेजीत होत्या. या सगळ्या उत्साहाच्या वातावरणाला रिक्षांच्या टंचाईने गालबोट लागत होते. अर्धा ते पाऊण तास प्रतीक्षा करूनही रिक्षा मिळत नव्हती. त्यातच आज भाविक खरेदीला सहकुटुंब बाहेर पडल्याने गर्दीत प्रचंड भर पडली होती. सगळ्यांचा हातात खरेदीच्या पिशव्या, वरती आभाळ भरून आलेले आणि रिक्षा मिळत नाही, अशा स्थितीत अनेकांची रखडपट्टी झाली.रविवार असल्याने शहर बस वाहतुकीची सेवाही मंदावलेली होती. गणरायांच्या मूर्तीची आणि पूजा साहित्यांची विक्री करणाऱ्या दुकानांचाही आज भरपूर सेल झाला. मूर्ती नोंदविण्यासाठी भक्तांनी आज दाटी केल्याने विक्रेत्यांना फुरसतही नव्हती. किराणा मालाची दुकाने तसेच अन्य सामग्रीची दुकाने यांच्यासाठीही आजचा दिवस तेजीचा ठरला. सकाळी काही काळ पावसाने हजेरी लावल्यामुळे आजच्या खरेदीच्या उत्सहावर पाणी पडते की काय, ही धास्ती सगळ्यांना होती. परंतु, गणरायाने सद्बुद्धी दिल्याने वरूणराजाने अल्पावधीतच काढता पाय घेतला. रात्री उशिरापर्यंत बाजारपेठेत प्रचंड गर्दी होती.