शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

CoronaVirus: अंगणवाडी सेविकेमुळे गर्भवती महिलेला मिळाले जीवनदान 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2020 5:17 PM

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रसंगावधानाने कांबळे या अंगणवाडी सेविकेने तात्काळ ऑटोरिक्षा बोलाविली आणि  आशा वर्कर सुनिता रमेश जोशी यांना सोबतीला घेऊन मंगल यांना तात्काळ आपटा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. 

पनवेल : पनवेल तालुक्यातील आपटा गावात अंगणवाडी सेविका अलका अनंत कांबळे या नियमित गृहभेटीकरिता गेल्या होत्या. त्यावेळी कांबळे यांच्या लक्षात आले की,  मंगल सुनील सीद या गरोदर महिलेस प्रसूती वेदना सुरू झाल्या आहेत. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रसंगावधानाने कांबळे या अंगणवाडी सेविकेने तात्काळ  ऑटोरिक्षा बोलाविली आणि  आशा वर्कर सुनिता रमेश जोशी यांना सोबतीला घेऊन मंगल यांना तात्काळ आपटा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल  केले. पुढील काही वेळातच आपटा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियांका चव्हाण आणि नेहा गांगुर्डे तसेच आरोग्य पर्यवेक्षिका नमिता पाटील, आरोग्य सेविका कल्पना वैष्णव यांनी  मंगल यांची वैद्यकीय तपासणी केली व त्यांची यशस्वी नैसर्गिक प्रसूती केली. मंगल सीद यांची  नैसर्गिक प्रसूती होवून त्यांनी एका गोंडस मुलाला जन्म दिला.बाळ व माता दोघांचीही तब्येत छान आहे.करोना विषाणूच्या या संकट काळात सबंध जग हे विलक्षण ताणतणावात आहे. एकीकडे लॉकडाऊन सुरु असताना तत्काळ या अंगणवाडी सेविकांनी कार्यतत्परता दाखविल्याने एका महिलेसह नवजात बालकाला जीवनदान मिळाले आहे. रायगड जिल्ह्यातील या अंगणवाडी सेविका,आशा वर्कर, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका व  आरोग्य पर्यवेक्षिका यांनी स्वतःच्या कर्तव्याची जाण ठेवून प्रसंगावधान दाखवून एका गरोदर महिलेस एक प्रकारे पुनर्जन्मच दिल्याने सर्व स्तरावरून या कर्तबगार महिलांचे कौतुक होत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या