शहरं
Join us  
Trending Stories
1
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
2
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
3
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
4
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
6
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
7
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
8
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
9
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
10
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
11
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
12
Latest Marathi News LIVE Updates: महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा
13
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
14
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
15
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
16
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
17
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
18
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
19
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
20
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

निर्माल्यातून कंपोस्ट खताची निर्मिती

By admin | Updated: September 26, 2015 01:21 IST

सध्या ग्लोबल वॉर्मिंगचा धोका संपूर्ण जगाला भेडसावत आहे. निसर्गाला पूरक सण साजरे करण्यासाठी विविध सामाजिक संस्था पुढाकार घेत आहेत

वैभव गायकर , पनवेलसध्या ग्लोबल वॉर्मिंगचा धोका संपूर्ण जगाला भेडसावत आहे. निसर्गाला पूरक सण साजरे करण्यासाठी विविध सामाजिक संस्था पुढाकार घेत आहेत. गणेशोत्सव हा सण मोठ्या प्रमाणात मुंबई उपनगरात साजरा केला जातो. विसर्जनावेळी अनेक जण निर्माल्य पाण्यात विसर्जित करतात. त्यामुळे जलप्रदूषण होतेच तसेच पाण्यामधील जीवसृष्टीला देखील धोका निर्माण होतो. लोकांच्या धार्मिक भावना जोडलेल्या असल्यामुळे जनजागृती करुन देखील ही बाब नागरिकांच्या लक्षात येत नाही. मात्र डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने निर्माल्यातून कंपोस्ट खताची निर्मिती करण्याचा प्रयोग हाती घेतला आहे. खारघरमध्ये हा प्रयोग राबविला जात असून या उपक्रमाला नागरिकांचा प्रतिसाद लाभल्यास संपूर्ण मुंबईभर हा उपक्रम राबविला जाणार आहे. खारघरमध्ये तीन विसर्जित ठिकाणी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे. विसर्जनासाठी आलेल्या मूर्तींना विसर्जित करुन त्याठिकाणचे निर्माल्य एकत्र करण्याचे काम हे स्वयंसेवक करीत आहेत. खारघरमध्ये कोपरा तलाव, मुर्बी तलाव, खारघर गावाजवळील विसर्जन घाटावर हे स्वयंसेवक हे निर्माल्य एकत्र करण्याचे काम करीत आहेत. खारघरमधील दीड दिवसाच्या ९५१ मूर्ती या ४९ स्वयंसेवकांनी विसर्जित केल्या व त्याठिकाणचा एकूण ४ टन निर्माल्य गोळा करण्यात आले आहे. तसेच पाच दिवसांच्या १४०९ मूर्तींना ७४ स्वयंसेवकांनी विसर्जित करुन जवळजवळ साडेपाच टन निर्माल्य जमा केले आहे. अशा दोन दिवसांचे साडेनऊ टन निर्माल्य खारघर गावाजवळील अंबिका भवन याठिकाणच्या मोकळ्या जागेत पुरुन त्यावर कंपोस्ट खतासाठी प्रक्रिया सुरु केली आहे. खारघर शहरामध्ये डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने तळोजा मध्यवर्ती कारागृहात एक हजार वृक्षांची लागवड काही महिन्यापूर्वी केली होती. त्यांच्या संवर्धनासाठी हे खत वापरले जाणार आहे. विशेष म्हणजे या उपक्रमामुळे निर्माल्यातून होणारा कचऱ्याची आपोआप विल्हेवाट लागणार असून जलप्रदूषण थांबणार आहे. तसेच यापासून निर्माण होणारे खत शेतीसाठी देखील वापरता येणार आहे. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने राबविलेल्या या उपक्रमासाठी विसर्जित ठिकाणी निर्माल्य कलश ठेवण्यात आले आहेत. तसेच दहा दिवसांच्या विसर्जनावेळी देखील मोठ्या संख्येने स्वयंसेवक विसर्जित ठिकाणी उपस्थित राहून निर्माल्य एकत्र करणार आहेत. या उपक्रमाला नागरिकांचा देखील चांगला प्रतिसाद लाभत असून खारघरमधील हा उपक्रम यशस्वी झाल्यास मुंबई उपनगरात देखील अशाप्रकारचा उपक्रम राबविण्यात येईल.