शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात महिला कर्मचाऱ्याची तक्रार

By admin | Updated: September 9, 2015 00:08 IST

सीडब्ल्यूसीचे अधिकारी लैंगिक शोषणासाठी पिळवणूक करत असल्याची तक्रार तिथल्याच कामगार महिलेने पोलिसांकडे केली आहे. पतीच्या निधनानंतर त्याच्या जागी नोकरीवर

नवी मुंबई : सीडब्ल्यूसीचे अधिकारी लैंगिक शोषणासाठी पिळवणूक करत असल्याची तक्रार तिथल्याच कामगार महिलेने पोलिसांकडे केली आहे. पतीच्या निधनानंतर त्याच्या जागी नोकरीवर लागलेली ही महिला गेली १५ वर्षांपासून वरिष्ठांच्या त्रासाने पीडित आहे. तक्रारीनंतरही संबंधितांना एपीएमसी पोलिसांचे पाठबळ मिळत असल्याचा आरोप महिलेने केला आहे.तुर्भे येथील सेंट्रल वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशन कंपनीत काम करणाऱ्या महिलेने तिथल्याच वरिष्ठ अधिकाऱ्याविरोधात एपीएमसी पोलिसांकडे तक्रार केली आहे. तर पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर संबंधितांचा त्रास वाढला असून त्याचा मनस्ताप होत असल्याचेही महिलेचे म्हणणे आहे. पतीच्या निधनानंतर त्याच्या जागी नोकरी देण्याकरिता सीडब्ल्यूसीच्या संबंधित अधिकाऱ्याने या महिलेकडे ५० हजार रुपये लाच मागितली होती. तसेच हॉटेलमध्ये भेटण्याचा निरोप सेक्रेटरीमार्फत धाडला होता. याबाबत महिलेने सीडब्ल्यूसीच्या वरिष्ठांकडे तक्रार करून त्या अधिकाऱ्याच्या मर्जीविरोधात नोकरी मिळवलेली आहे. तेव्हापासून छळ होत असल्याचे पीडित महिलेने तक्रारीत म्हटलेले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्याकडून शारीरिक शोषणासाठी होत असलेल्या त्रासाची तक्रार सदर महिलेने एपीएमसी पोलिसांकडे केली आहे. परंतु तक्रार करूनही संबंधितावर कारवाई करण्यास पोलीस टाळाटाळ करत असल्याचे पीडित महिलेचे म्हणणे आहे. तर अधिकाऱ्याविरोधात तक्रार केल्यामुळे सीडब्ल्यूसीमध्ये प्रवेशबंदी करून नियमबाह्य बदली करण्यात आल्याचेही महिलेचे म्हणणे आहे.यापूर्वी एका महिलेने फसवणूक व बलात्काराची तक्रार एपीएमसी पोलिसांकडे केली होती. परंतु तिच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. अखेर तिने आयुक्तांकडे दाद मागितल्यानंतर गुन्हा दाखल झाला. त्यानंतर अश्लील फोनमुळे त्रस्त तरुणी पोलिसांकडे तक्रारीसाठी आली होती. तिचीही तक्रार घेण्यात आली नाही. अखेर तत्कालीन एका अधिकाऱ्याने तिची दखल घेत गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली होती. त्यामुळे वरिष्ठ निरीक्षकपदी असलेली महिला महिलांच्या तक्रारीकडे दाद देत नसल्याचा अनेकींचा अनुभव आहे.