शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

कचऱ्यापासून सीएनजी

By admin | Updated: September 1, 2015 04:43 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी व फळ मार्केटमधून रोज जवळपास ८० टन ओला कचरा निर्माण होत आहे. या कचऱ्यातून सीएनजी निर्मिती करण्याचा प्रकल्प

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी व फळ मार्केटमधून रोज जवळपास ८० टन ओला कचरा निर्माण होत आहे. या कचऱ्यातून सीएनजी निर्मिती करण्याचा प्रकल्प उभारावा असा प्रस्ताव महापालिकेने एपीएमसीला दिला असून प्रशासनानेही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ म्हणून मुुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे. येथील विविध मार्केटमध्ये प्रत्येक वर्षी १२ हजार कोटींपेक्षा जास्त उलाढाल होते. कांदा, भाजी व फळ मार्केटमध्ये रोज ७०० ते ८०० वाहनांमधून कृषी माल विक्रीसाठी येत असतो. या तीन मार्केटमधून रोज जवळपास ८० टन कचरा तयार होत असतो. हा कचरा महापालिकेच्या डम्पिंग ग्राउंडवर टाकण्यात येत असतो. यापूर्वी बाजार समिती प्रशासनाने कचऱ्यातून वीजनिर्मिती करण्याचा प्रस्ताव तयार केला होता. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजनही केले होते. परंतु प्रशासनास सिडकोकडून जागाच उपलब्ध झाली नसल्यामुळे तो प्रकल्प बारगळला होता. महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी गत आठवड्यात बाजार समितीला भेट देवून पाहणी केली. येथील अनधिकृत बांधकाम, कचरा व इतर गोष्टींची पाहणी केली. तीन मार्केटमध्ये मोठ्याप्रमाणात ओला कचरा असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या कचऱ्यावर प्रक्रिया केली तर सीएनजी गॅस तयार होवू शकतो अशी संकल्पना त्यांनी प्रशासनासमोर मांडली. बाजार समितीने स्वत: हा प्रकल्प राबवावा नाहीतर महापालिकेस तो राबविण्याची सहमती द्यावी असेही त्यांनी सुचविले.