शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

लोगोवरील दावा सोडणार नाही

By admin | Updated: September 23, 2015 23:50 IST

मीरा-भार्इंदर पालिकेतील कामचुकार अधिकाऱ्यांमुळे प्रशासनावर गेल्या २४ वर्षांपासून वापरात असलेला अनोंदणीकृत लोगो सेव्हन ईलेव्हन ग्रुप आॅफ कंपनीज्ने हायजॅक केला असला

राजू काळे, भार्इंदरमीरा-भार्इंदर पालिकेतील कामचुकार अधिकाऱ्यांमुळे प्रशासनावर गेल्या २४ वर्षांपासून वापरात असलेला अनोंदणीकृत लोगो सेव्हन ईलेव्हन ग्रुप आॅफ कंपनीज्ने हायजॅक केला असला तरी त्यावरील दावा आम्ही कदापी सोडणार नसल्याचा पावित्रा लोकमतमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तामुळे जागे झालेल्या प्रशासनाने घेतला आहे.ग्रामपंचायतीनंतर १९९१ मध्ये प्रथमच पार पडलेल्या नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत विजयी झालेल्या नगरसेवकांनी त्यावेळचे नगरसेवक लियो कोलासो यांनी ९ ग्रामपंचायतीसह आरोग्य सेवा, शहरीकरण, शेतकरी, मीठागरे, डोंगराळभाग आदींचा समावेश असलेला लोगो तयार करुन तो मान्यतेसाठी नियोजन समितीपुढे ठेवला होता. त्यावेळचे नगराध्यक्ष गिल्बर्ट मेंडोन्सा यांच्या नेतृत्वाखालील समितीने लोगोला मान्यता दिल्यानंतर तसा लेखी ठराव पालिका दप्तरी असल्याची माहिती राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक आसिफ शेख यांनी लोकमतला दिली आहे. तेव्हापासून हा लोगो पालिका व्यवहारात असून तो अद्यापही नोंदणीकृत न झाल्यावर मात्र त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अखेर तो भाजपा आ. नरेंद्र मेहतांच्या सेव्हन ईलेव्हन ग्रुप आॅफ कंपनीज्ने नोव्हेंबर २०१३ मध्ये नोंदणीकृत केल्याचे कंपनीच्या सूत्रांकडून सांगण्यात आल्याने पालिकेवर, अनेक वर्षांपासून वापरात असलेल्या लोगोला गमावण्याची नामुष्की ओढवली आहे. हा संतापजनक प्रकार लोकमतने २१ सप्टेंबरच्या अंकातील वृत्तातून उजेडात आणल्यानंतर शहरभर त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. अनेक राजकीय पक्ष प्रशासनाच्या नाकर्तेपणावर आंदोलन छेडण्याच्या तयारीत असल्याने प्रशासनाकडून सारवासारव करण्यास सुरुवात झाली आहे.पालिका उपायुक्त (मुख्यालय) गणेश देशमुख यांनी, संबंधित कंपनीने लोगोच्या नोंदणीसाठी जानेवारी २०१४ मध्ये अर्ज केल्याचा दावा करुन पालिकेला त्याची माहिती दिल्यानंतर मार्च २०१४ मध्ये प्रशासनाने लोगो नोंदणीसाठी अर्ज केल्याची माहिती दिली आहे. परंतु, कंपनीने दीड वर्षांपूर्वीच लोगो नोंदणीकृत केला असतानाही अद्याप महापालिकेचा लोगो नोंदणीकृत झालेला नाही. नोंदणी अर्जानंतर तो १९ महिन्यानंतर नोंदणीकृत करण्यात येत असल्याचा दावाही उपायुक्तांनी केला आहे. काहीही असो अनेक वर्षांपासून वापरात असलेल्या लोगोवरील दावा मात्र पालिका कोणत्याही स्थितीत सोडणार नसल्याचे त्यांनी शेवटी स्पष्ट केले आहे.