शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्ता हस्तांतरणाला सिडकोची तत्त्वत: मान्यता

By admin | Updated: July 17, 2017 01:31 IST

पनवेल महापालिका क्षेत्रातील कचराप्रकरणी हेतूपुरस्सर गैरसमज पसरविले जात आहेत. महापालिका सध्या याप्रकरणी सक्षम नसली

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रातील कचराप्रकरणी हेतूपुरस्सर गैरसमज पसरविले जात आहेत. महापालिका सध्या याप्रकरणी सक्षम नसली तरी कधी ना कधी ही जबाबदारी महापालिकेला उचलावी लागणारच आहे. सिडकोने हे काम ठेकेदारी पद्धतीने राबवले असून डम्पिंग ग्राउंडही उपलब्ध करून दिले आहे. महापालिकेने निविदा काढून कचरा उचलण्यासाठी ठेकेदाराची नियुक्ती करावी, असे मत सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी व्यक्त केले.पनवेल संघर्ष समितीने शुक्रवारी बेलापूर सिडको भवन येथे गगराणी यांची भेट घेवून महापालिका आणि नैना तसेच प्रकल्पग्रस्तांच्या महत्त्वाच्या दहा प्रश्नांवर सविस्तरपणे चर्चा केली. महापालिकेच्या क्षेत्रातील संपूर्ण मालमत्तेचे हस्तांतरणाची प्रक्रि या त्वरित सुरू करावी, खारघरचे मालकी हक्क महापालिकेकडे दिल्यास महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होईल, असेही शिष्टमंडळाने सांगितले. यावेळी गगराणी म्हणाले, खारघर येथे मेट्रोसहित मोठे प्रकल्प सिडकोने हाती घेतले आहेत. विमानतळाचा प्रकल्प आणि पनवेल परिसरातील नैना प्रकल्प सिडको राबविणार असल्याने खारघरसंदर्भात काही अधिकार सिडकोने राखून ठेवले आहेत. तेथील रस्ता, पाणी, घनकचरा, सांडपाण्याचा निचरा, गटारे, दिवाबत्तीची सोय सिडको पाहत असल्याचे त्यांनी सांगितले. नवी मुंबईच्या घणसोली नोडचे २६ वर्षांनंतर महापालिकेकडे हस्तांतरण झाले. तशीच स्थिती खारघरबाबत होऊ नये अशी अपेक्षा वेळी व्यक्त करण्यात आली.