शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोला पडला आदिवासींचा विसर?

By admin | Updated: December 21, 2015 01:36 IST

सिडकोच्या दक्षिण स्मार्ट सिटी प्रकल्पाचे उद्घाटन नुकतेच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. सिडकोचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या खारघर शहराचा देखील यामध्ये समावेश आहे.

वैभव गायकर, पनवेल सिडकोच्या दक्षिण स्मार्ट सिटी प्रकल्पाचे उद्घाटन नुकतेच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. सिडकोचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या खारघर शहराचा देखील यामध्ये समावेश आहे. मात्र अनेक वर्षे विकासापासून दूर असलेल्या खारघरमधील आदिवासी पाड्यांचा या स्मार्ट सिटी योजनेत काहीच विचार केलेला दिसून येत नाही. येथील गावठाण तसेच आदिवासी पाडे अद्यापही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. तेव्हा आमचे काय? असा प्रश्न येथील पाड्यातील आदिवासी करीत आहेत.स्मार्ट सिटी योजनेत आदिवासी पाड्यांचा विस्तार करण्याकरिता कोणतेच धोरण राबविले गेले नाही. खारघर शहरात फणसवाडी, चाफेवाडी, हेदोरेवाडी, धामोळे, घोलवाडी, बेलपाडा वाडी, फरशीपाडा या आदिवासी पाड्यांचा समावेश आहे. सिडको येण्यापूर्वी हे आदिवासी पाडे याठिकाणी आहेत. सिडकोने याठिकाणच्या जमिनी संपादित करून मोठमोठे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रकल्प आणले. टोलेजंग इमारती उभारल्या मात्र आजही याठिकाणचे आदिवासी बांधव पिण्याच्या पाण्यासाठी शहरात पायपीट करीत आहेत.वनविभागाच्या धोरणामुळे लाकूडतोडीवर देखील बंदी आली आहे मग आम्ही आमची उपजीविका भागवावी कशी? जेवण बनविण्यासाठी लागणाऱ्या चुलीत लाकडेच नसतील तर आम्ही आमच्या चुली पेटवणार कशा असा संतप्त सवाल हे आदिवासी करीत आहेत. एकीकडे शाळा स्मार्ट होत आहेत तर या आदिवासी पाड्यामध्ये शाळांची दुरवस्था झाली आहे. रोजगार नाही, शिक्षणापासून वंचित असलेल्या या समाजामध्ये नोकरदार वर्ग कमी आहे. मोलमजुरी देखील नष्ट होत चालली आहे . सिडकोने गाव -गावठाणासाठी २०० कोटींच्या निधीची तरतूद केली आहे . मात्र यामध्ये आदिवासी पाडे देखील विकसित केली जाणार आहेत का? असा प्रश्न आदिवासी बांधवांमधून उपस्थित केला जात आहे.