Video : फुंडे गावानजीक सिडकोचा पुल कोसळला; दुचाकीस्वार जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2021 20:51 IST2021-04-14T20:47:41+5:302021-04-14T20:51:28+5:30
CIDCO bridge collapses : या घटनेत एक दुचाकी स्वार जखमी झाला आहे.

Video : फुंडे गावानजीक सिडकोचा पुल कोसळला; दुचाकीस्वार जखमी
मधुकर ठाकूर
उरण : उरण तालुक्यातील डोंगरी,फुंडे,पाणजे या तीन गावांना जोडणारा सिडकोच्या अखत्यारीतील क्रॉक्रिटचा पुल मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास अचानक कोसळला.या घटनेत एक दुचाकी स्वार जखमी झाला आहे.
उरण तालुक्यातील फुंडे ग्रामपंचायतीच्या हद्दीत चार वर्षांपूर्वी सिडकोच्या माध्यमातून क्रॉक्रिटचा पुल उभारण्यात आला होता.डोंगरी,फुंडे,पाणजे या तीन गावांना जोडणारा पुल नागरिकांना वाहतुकीसाठी सुकर झाला होता.मात्र मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास अचानक कोसळला.यावेळी पुलावरून जाणारा एक दुचाकी स्वार गाडीसह पुलावरून कोसळला.मागुन येणाऱ्या नागरिकांनी मोठ्या प्रयासाने दुचाकी स्वारास रस्सीच्या सहाय्याने खेचून वर काढले.जखमी अवस्थेतील दुचाकी स्वारास उपचारासाठी येथील जेएनपीटी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.सिडकोच्या निकृष्ट दर्जाच्या
कामामुळे पुल कोसळल्याची चर्चा नागरिकांकडून केली जात आहे.
उरण तालुक्यातील फुंडे गावानजीक सिडकोचा पुल कोसळला; दुचाकीस्वार जखमी pic.twitter.com/HXLW8MmFeJ
— Lokmat (@MiLOKMAT) April 14, 2021