चौगुलेंना अंतरिम जामिनात मुदतवाढ

By Admin | Updated: January 10, 2015 01:58 IST2015-01-10T01:58:46+5:302015-01-10T01:58:46+5:30

शिवसेना जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांना न्यायालयाने अंतरिम जामिनात १६ जानेवारीपर्यंतची मुदतवाढ दिली आहे. त्यांच्यावर बेलापूर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता.

Chugulenna interim bail extended | चौगुलेंना अंतरिम जामिनात मुदतवाढ

चौगुलेंना अंतरिम जामिनात मुदतवाढ

नवी मुंबई : शिवसेना जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांना न्यायालयाने अंतरिम जामिनात १६ जानेवारीपर्यंतची मुदतवाढ दिली आहे. त्यांच्यावर बेलापूर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता.
सीबीडी येथे राहणाऱ्या तरुणीने शिवसेना जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार केली होती. त्यानुसार सीबीडी पोलीस ठाण्यात १६ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल झाला होता. मात्र त्यानंतर दोन दिवसात चौगुले यांनी अंतरिम जामीन मिळवला होता. त्यानंतर शुक्रवारी ही मुदत संपताच पुन्हा त्यात १६ जानेवारीपर्यंतची वाढ न्यायालयाने दिल्याचे सीबीडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक मीरा बनसोडे यांनी सांगितले.(प्रतिनिधी)

Web Title: Chugulenna interim bail extended