शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
3
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
6
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
7
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
8
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
9
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
10
६ मिनिटं वाचन केल्याने ६८% नी मानसिक तणाव कमी होतो, पण वाचनाची आवड लावायची कशी?
11
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
12
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
13
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
14
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
15
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
16
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
17
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
18
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
19
कोण आहे सीताराम बाबा? ज्यांनी भाजपा आमदाराला जोरजोरात ठोसे मारले अन् ढकलून दिलं, Video व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
Daily Top 2Weekly Top 5

खारफुटीवर सीसीटीव्हीचा वॉच

By admin | Updated: November 10, 2015 01:20 IST

खारफुटीची नासाडी करणाऱ्या प्रवृत्तींवर वॉच ठेवण्यासाठी कांदळवनांवर सीसीटीव्ही लावण्याचे निर्देश कोकण विभागीय महसूल आयुक्त तानाजी सत्रे यांनी महापालिकेला दिले आहेत.

नवी मुंबई : खारफुटीची नासाडी करणाऱ्या प्रवृत्तींवर वॉच ठेवण्यासाठी कांदळवनांवर सीसीटीव्ही लावण्याचे निर्देश कोकण विभागीय महसूल आयुक्त तानाजी सत्रे यांनी महापालिकेला दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थापन झालेल्या कांदळवन संरक्षण समितीची बैठक सोमवारी कोकणभवन येथे पार पडली. या बैठकीत सत्रे यांनी या सूचना केल्या आहेत. या बैठकीस पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे, नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण, उपायुक्त (महसूल ) भाऊसाहेब दांगडे, सिडकोच्या पर्यावरण व वने विभागाचे महाव्यवस्थापक जी. के. अनारसे, विभागीय वन अधिकारी कांदळवन संधारण घटक संजय माळी, नवी मुंबई एन्वारमेंट प्रिझर्वेशन सोसायटीचे प्रतिनिधी अनुपम वर्मा, सिडकोचे मुख्य नियोजक एम. डी. लेले, वनाधिकारी सीमा आडगांवकर आदी उपस्थित होते. सत्रे यांनी उपस्थित समिती सदस्यांना मार्गदर्शन केले. सिडको, महानगरपालिका, वन विभाग व पोलीस यामध्ये योग्य समन्वय ठेवण्याची जबाबदारी या समितीची राहील, असे सत्रे यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच प्रत्येक महिन्याला कांदळवन संरक्षण संनियंत्रण समितीची आढावा बैठक घेण्याचेही सूचित केले. महानगरपालिका व सिडको यांच्याकडील घनकचरा संबंधीच्या नागरिकांच्या तक्रारी समितीच्या बैठकीत सादर कराव्यात. त्या तक्रारीवर करण्यात आलेल्या अंमलबजावणीबाबतचा अहवाल या बैठकीत ठेवण्यात यावा. घनकचरा नियंत्रणासाठी नवी मुंबई महानगरपालिकेत दोन पथके तयार करण्यात आली आहेत. तसेच महानगरपालिका व सिडको यांच्याकडे नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी डेब्रिज टाकून कांदळवन नष्ट केले आहे, तेथील डेब्रिज काढून पुन्हा कांदळवनाची लागवड करण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या. तसेच महापालिका क्षेत्रात दोन मोठे कांदळवन आहेत. या दोन ठिकाणी महापालिकेने सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत. परंतु त्यानंतरही खारफुटीची नासाडी सुरूच असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी सीसीटीव्ही लावावेत, अशा सूचना सत्रे यांनी यावेळी महापालिकेला केल्या आहेत. (प्रतिनिधी)