शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांचे खिसे कापणाऱ्या टोळीला अटक

By admin | Updated: September 23, 2015 04:20 IST

बसमधील प्रवाशांचे खिसे कापणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून तिन गुन्ह्यांची उकल झाली असून ५१ हजार रुपयांची रक्कमही पोलीसांनी जप्त केली आहे.

नवी मुंबई : बसमधील प्रवाशांचे खिसे कापणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून तिन गुन्ह्यांची उकल झाली असून ५१ हजार रुपयांची रक्कमही पोलीसांनी जप्त केली आहे.बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे पाकीट चोरीला गेल्याच्या घटना काही दिवसांपासून शहरात घडत होत्या. अशाच प्रकारे बसमध्ये अडवणुक करुन प्रवाशाचे १० हजार रुपये चोरल्याची घटना रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. त्यामुळे बसमधील पाकीटमार टोळीच्या शोधात गुन्हे शाखेच्या पोलीसांनी पाऊल उचलले होते. त्यानुसार खंडणी विरोधी पथकाने खिसे कापणाऱ्या टोळीच्या तिघांना अटक केली आहे. जुबेर सय्यद (३२), सचिन कुचिकोरवे उर्फ सत्या (२८) व भास्कर पाल (३५) अशी त्यांची नावे आहेत. तिघेही अनुक्रमे मुंब्रा, धारावी व गोवंडीचे राहणारे आहेत. खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ निरिक्षक राजन जगताप यांच्या पथकाने प्रथम जुबेरला अटक केल्यानंतर त्याच्या माहितीनुसार इतर दोघांना अटक करण्यात आली. त्यांनी एपीएमसी व वाशी परिसरात गुन्हे केले असून त्यापैकी तिन गुन्ह्यांची उकल झाली आहे. या गुन्ह्यातील ५१ हजार ७०० रुपयांची रक्कम पोलीसांनी टोळीकडून हस्तगत केली आहे. त्यांच्याकडून इतर अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे. या टोळीमध्ये अजून कोणाचा समावेश आहे का, याचीही पोलीस चौकशी करीत आहेत. (प्रतिनिधी)