शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 03:38 IST

पुणे येथील बांधकाम व्यावसायिक मिलिंद पुरुषोत्तम देशपांडे यांची भोकरपाडामधील पाच जणांनी फसवणूक केली आहे. विक्री झालेल्या जमिनीची दुसऱ्यांदा विक्री

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : पुणे येथील बांधकाम व्यावसायिक मिलिंद पुरुषोत्तम देशपांडे यांची भोकरपाडामधील पाच जणांनी फसवणूक केली आहे. विक्री झालेल्या जमिनीची दुसऱ्यांदा विक्री करून तब्बल ५१ लाख रुपयांची फसवणूक केली असून, याप्रकरणी नवीन पनवेल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रस्तावित विमानतळ प्रकल्पामुळे नैना क्षेत्रातील जमिनीचे भाव वधारले आहेत. राज्य व देशातील बांधकाम व्यावसायिक या परिसरात जमीन विकत घेत आहेत. जमिनीच्या व्यवहारामध्ये फसवणूक होण्याचे प्रकारही समोर येऊ लागले आहेत. पुणे कोथरूड परिसरामधील बांधकाम व्यावसायिक मिलिंद पुरुषोत्तम देशपांडे यांनीही भोकरपाडा बारवई येथील ३८ गुंठे जमीन खरेदी केली होती. आयुष रिअ‍ॅल्टीचे विनायक खरात, मधुकर भाईर, प्रकाश राम चव्हाण यांच्या मध्यस्तीने त्यांनी जनार्दन दुध्या पाटील, रमेश पाटील, कमलाकर पाटील, तुकाराम पाटील, सुनीता बेडेकर यांच्याबरोबर प्रतिगुंठा ४ लाख १० हजार याप्रमाणे जमीन खरेदीसाठीचा व्यवहार केला होता. पूर्ण जमिनीसाठी १ कोटी ५९ लाख ९० हजार रुपये मोबदला देण्याचे निश्चित केले होते. करार करताना साक्षीदार म्हणून मधुकर भोईर व प्रकाश चव्हाण यांनी सही केली होती. या व्यवहारासाठी तत्काळ १० लाख रुपये संबंधित शेतकऱ्यांना देण्यात आले. उर्वरित ४० लाख रुपये खरेदीखत करण्याच्या वेळी व उर्वरित ५० लाख खरेदीखत झाल्यानंतर १५० दिवसांमध्ये देण्याचे निश्चित करण्यात आले होते. जमिनीची मोजणी केल्यानंतर ती १ गुंठा कमी झाल्याने हा व्यवहार १ कोटी ५५ लाख ८० हजार रुपयांना निश्चित झाला. कराराप्रमाणे जमिनीचे खरेदीखत करताना जनार्दन पाटील यांना २१ लाख, रमेश पाटीलला १३ लाख, कमलाकर यांना ९ लाख, तुकाराम यांना ६ व सुनीता सीताराम बेडेकर यांना २ लाख रुपये देण्यात आले. डिसेंबर २०१६मध्ये हा व्यवहार करण्यात आला होता. जमिनीचा व्यवहार झाल्यानंतर फेब्रुवारी २०१७मध्ये जमिनीच्या आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी फोन करून तुमच्या जमिनीवरील गवत आम्ही कापू का? अशी विचारणा केली. त्यांना त्याविषयी परवानगी दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या नागरिकांचा फोन आला की आम्हाला काही जणांनी गवत कापण्यास विरोध करून जमीन आमच्या मालकीची असल्याचा दावा केला आहे. यानंतर देशपांडे यांनी संगणकावर तपशील मिळविण्याचा प्रयत्न केल्यानंतर ही जमीन जनार्दन पाटील यांनी चेंबूरमधील एस. एम. राजा अण्णा मलाई याला विकली असल्याचे निदर्शनास आले. यानंतर पनवेल दुय्यम निबंधक कार्यालयातून माहिती घेतली असता जमीन मलाई यांना विकल्याचे निदर्शनास आले. यापूर्वीच विकलेल्या जमिनीचा पुन्हा व्यवहार करून ५१ लाख रुपयांची फसवणूक केली असल्याबद्दल मिलिंद देशपांडे यांनी नवीन पनवेल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून, पोलिसांनी पाच जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. व्यवहारासाठी तत्काळ १० लाख रुपये संबंधित शेतकऱ्यांना देण्यात आले. उर्वरित ४० लाख रुपये खरेदीखत करण्याच्या वेळी व ५० लाख खरेदीखत झाल्यानंतर १५० दिवसांमध्ये देण्याचे निश्चित करण्यात आले होते. जमिनीची मोजणी केल्यानंतर ती १ गुंठा कमी झाल्याने हा व्यवहार १ कोटी ५५ लाख ८० हजार रुपयांना निश्चित झाला होता.