शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

वाशीमध्ये मांसाची गाडी अडवल्याप्रकरणी दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 04:12 IST

ट्रकमधून नेले जाणारे मांस गोमांस असल्याचे धमकावून पोलिसांकडे खोटी तक्रार करणाऱ्या दोघांना वाशी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांचे तिघे साथीदार फरार

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : ट्रकमधून नेले जाणारे मांस गोमांस असल्याचे धमकावून पोलिसांकडे खोटी तक्रार करणाऱ्या दोघांना वाशी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांचे तिघे साथीदार फरार झाले असून, ते सर्व जण स्वत:ला पत्रकार सांगत होते. स्वत:ला पत्रकार सांगणाऱ्या पाच जणांनी वाशी टोल नाक्यावर एक ट्रक अडवला होता. त्यामध्ये असलेले मांस गाईचे असल्याचा त्यांचा आरोप होता. मात्र ट्रकमधील व्यक्तीने त्यांना ते मांस म्हशीचे असून त्याची आवश्यक कागदपत्रे देखील दाखवली. यानंतरही त्यांनी वाशी पोलिसांकडे खोटी तक्र ार केली होती. अखेर पालिकेच्या पशू वैद्यकीय तज्ज्ञामार्फत मांस तपासले असता ते म्हशीचे असल्याचे सिद्ध झाले. यामुळे खोटी तक्रार करून अधिकार नसतानाही वाहन अडवल्या प्रकरणी त्या पाच तोतया पत्रकारांच्या विरोधात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी दोघांना अटक झाली असून किशोर पाटील व गुलाब गुप्ता अशी त्यांची नावे आहेत. त्यांचे तिघे साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. त्या पाच जणांमध्ये दोन महिलांचाही समावेश असून त्या ठाणे व पुण्याच्या राहणाऱ्या आहेत.