शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासकीय भवनाचे भूमिपूजन होणार

By admin | Updated: October 5, 2015 00:47 IST

पालिका मुख्यालयातील मर्यादित जागेमुळे प्रशासनाच्या दैनंदिन कारभारात अडचण निर्माण होत असल्याने वाढलेल्या कारभार कार्यक्षम करण्यासाठी प्रशासनाने मीरा रोडच्या हद्दीतील छत्रपती

भार्इंदर : पालिका मुख्यालयातील मर्यादित जागेमुळे प्रशासनाच्या दैनंदिन कारभारात अडचण निर्माण होत असल्याने वाढलेल्या कारभार कार्यक्षम करण्यासाठी प्रशासनाने मीरा रोडच्या हद्दीतील छत्रपती शिवाजी मार्गालगत लवकरच नवीन प्रशासकीय भवन बांधण्याचे निश्चित केले असून त्याच्या भूमिपूजनाचा सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आॅक्टोबरमध्ये पार पडणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.या नियोजित प्रशासकीय भवनाच्या निर्मितीचे वृत्त सर्वप्रथम लोकमतमध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. शहराचे भौगोलिक क्षेत्रफळ ७९.४ चौरस किलोमीटर इतके असून लोकसंख्या १२ लाखांहून अधिक असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. यावरून लोकसंख्येची घनता लक्षात येत असून वाढत्या लोकवस्तीमुळे पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी पालिकेच्या दैनंदिन कारभारावर ताण पडत आहे. सध्या पालिकेच्या अखत्यारीत ६ प्रभाग समिती कार्यालयांसह मीरा रोड येथील विभागीय कार्यालय व मुख्यालय या वास्तू असल्या तरी त्यातील जागा अपुऱ्या पडू लागली आहे. वाढीव जागेसाठी मुख्यालयाचे विस्तारीकरण शासनाच्या पर्यावरणवादी धोरणात अडकले असून त्याला २००२ मध्ये लागू झालेल्या सीआरझेड आराखड्यात प्रशासनाचा गलथान कारभार कारणीभूत असल्याचा आरोप होऊ लागला आहे. राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाच्या परवानगीनुसार मुख्यालयाचा विस्तार करता येत नसल्याची तांत्रिक अडचण प्रशासनाच्या माथी पडल्याने मुख्यालय विस्ताराखेरीज नवीन प्रशासकीय भवन निर्माण करण्याचे प्रशासनाने निश्चित केले आहे. ही नवीन वास्तू मीरा रोडच्या एस.के. स्टोन पोलीस चौकीमागील सर्व्हे क्र. ४७१, ४८१ व ४८४ मधील जागेवर निर्माण करण्यात येणार असून त्याचा आराखडा येत्या दोन दिवसांत प्रशासनाला सादर होण्याची शक्यता आहे. सध्या या जागेवर काही वादग्रस्त बांधकामे अस्तित्वात तर काही सुरू असून ती निष्कासित करण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे. (प्रतिनिधी)