शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

बाप्पा मोरया रे

By admin | Updated: September 14, 2015 04:11 IST

762 गणेशमूर्तिकार जिल्ह्यातील १५ तालुक्यांत आहेत तर या व्यवसायात व्यस्त कामगारवर्ग जवळपास १० हजार आहे. या ७६२ गणेशमूर्तिकारांच्या कार्यशाळांमध्ये यंदा

762 गणेशमूर्तिकार जिल्ह्यातील १५ तालुक्यांत आहेत तर या व्यवसायात व्यस्त कामगारवर्ग जवळपास १० हजार आहे. या ७६२ गणेशमूर्तिकारांच्या कार्यशाळांमध्ये यंदा एकूण १७ लाख २४ हजार ३०० गणेशमूर्तींची निर्मिती झाली असून पेण शहर वगळता ही आर्थिक उलाढाल तब्बल ७ कोटी २० हजार रुपयांच्यावर आहे. लोकमत चमू सर्वेक्षणातून प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात पेणवगळता सर्वाधिक १०० गणेशमूर्तिकार कर्जत तालुक्यात आहेत, तर सर्वाधिक ३० हजार गणेशमूर्तींंची निर्मिती करुन पनवेल तालुका जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आहे. रायगड जिल्ह्यातील विशेषत: ग्रामीण भागातील घरगुती गणेशोत्सवाचा वेध ‘लोकमत’चमुने घेतला आहे.जिल्ह्यात पेण हे शहर गणेशमूर्ती निर्मितीचे जागतिक कीर्तीप्राप्त केंद्रच आहे, परंतु त्या व्यतिरिक्त जिल्ह्यातील ग्रामीण भागातही गणेशमूर्ती निर्मितीचा उद्योग प्रचंड मोठा आहे. विघ्नहर्त्या गणपतीवर असलेल्या असीम श्रद्धेतून गणेशमूर्ती घरोघर आणून गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा गेल्या कित्येक वर्षांपासून जिल्ह्यात असल्याने येथील गणेशोत्सव निर्मितीचा व्यवसाय देखील जिल्ह्यात दोनशे वर्र्षांपासूनचा असल्याचे सांगितले जाते. येत्या गुरुवारी गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशोत्सवास प्रारंभ होत आहे.20कोटींची सर्वाधिक आर्थिक उलाढाल पनवेल तालुक्यात होणे अपेक्षित आहे. तर त्या खालोखाल अलिबाग तालुक्यात सव्वा कोटी रुपयांची उलाढाल आहे. पूर्वी रायगडचे हे गणेशमूर्तिकार स्थानिक पातळीवरच गणेशमूर्तींची निर्मिती करीत असत मात्र आता पेण व हमरापूर येथून गणपतीच्या कच्च्या मूर्ती आणून आपापल्या गावी रंगकाम करुन विक्री करण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. काही जण तर थेट पेण येथूनच तयार गणेशमूर्ती आणून विक्री करण्याचा व्यवसाय करीत आहेत. जिल्ह्यात गणेशोत्सव निर्मीतीचा व्यवसाय दोनशे वर्षापासूनचा असल्याचे सांगितले जाते.तळा : तालुक्यात अंदाजे १० गणेशमूर्तींचे कारखानदार आहेत. वसंत पोळेकर हे गेली ४५ वर्षे गणेशमूर्तीचा कारखाना चालवत आहेत. तर त्यांचे कारखान्यात लहान मोठ्या सुमारे १२०० गणेशमूर्ती तयार करत आहेत. सतीश शिंदे हे जवळपास १५ वर्षे कारखाना चालवत असून ५०० च्या जवळपास मूर्ती तयार करताना. किरण सातांबेकर हे जवळपास ३० वर्षे कारखाना चालवत असून ४०० गणेशमूर्ती तयार करीत आहेत. तळे येथे एकूण चार हजाराच्या आसपास गणेशमूर्ती तयार होत आहेत. पूर्वी शाडूच्या मातीच्या गणेशमूर्ती बनविल्या जात असत. परंतु आज शाडूची माती महाग झालेली आहे आणि कारागीर मिळत नाहीत. त्यामुळे बहुतांशी कारखानदार प्लास्टर आॅफ पॅरिसच्या गणेशमूर्ती बनवतात. मी जवळपास ५०० ते ६०० मूर्ती शाडू मातीच्या बनवितो असे कारखानदार वसंत पोेळेकर यांनी सांगितले. तळे तालुक्यात जवळपास ५० ते ६० लाख रुपयांची उलाढाल या कारखान्यांमुळे होते.