शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

बाप्पा देतोय व्यसनमुक्तीचा संदेश

By admin | Updated: September 25, 2015 02:29 IST

तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे कर्करोग होण्याचा धोका वाढतो, याविषयी जनजागृती करूनही अनेकजण व्यसनांच्या जाळ््यात अडकतातच.

मुंबई: तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे कर्करोग होण्याचा धोका वाढतो, याविषयी जनजागृती करूनही अनेकजण व्यसनांच्या जाळ््यात अडकतातच. तरुणांना व्यसनमुक्त करण्यासाठी धारावीत चक्क एक सिगारेटचा बाप्पा साकारण्यात आला आहे. हा बाप्पा गणेशभक्तांना ‘डोन्ट ब्लेम मी फॉर युवर डेथ’ असा संदेश जणू देत आहे. धारावी येथील सकिनाबाई चाळीतील ‘सिद्धिविनायक फेस्टिव्हल गणेशोत्सव मंडळ’ने सिगारेटच्या रिकाम्या पाकिटांपासून ४ फुटांची गणेशमूर्ती साकारली आहे. ही गणेशमूर्ती साकारायला १ वर्षाचा कालावधी लागला. तरुणाई मोठ्या प्रमाणात व्यसनांच्या आहारी जाते आहे. यामुळे त्यांना कर्करोग होण्याचा धोका बळावतो. तरुणाईला व्यसनमुक्त करण्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा होती. यातूनच सिगारेटच्या पाकिटांचा बाप्पा साकारण्याची संकल्पना पुढे आल्याचे मंडळाचे अध्यक्ष आणि मूर्तिकार सेल्वराज नाडर यांनी सांगितले. अनेक माध्यमांतून कर्करोग टाळण्यासाठी जनजागृती होताना दिसते. याचा काही प्रमाणात फायदाही होतो. पण तरीही अनेक जण व्यसनांच्या आहारी जाताना दिसत आहेत. गणेशोत्सवाच्या काळात अनेक गणेशभक्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेटी देत असतात. या भक्तांचे फक्त मनोरंजन न करता त्यांच्या मानसिकता बदलण्यासाठी ‘डोन्ट ब्लेम मी फॉर युवर डेथ’ हा संदेश बाप्पा स्वत:च देत असल्याने नक्की फरक पडले, असे वाटले म्हणून ही संकल्पना राबविली, असे नाडर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)