शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
3
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
4
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
5
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
6
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
7
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
8
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
9
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
10
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
11
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
12
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
13
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
14
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
15
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
16
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
17
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
18
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
19
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
20
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

बाळासाहेबांचे स्मारक सहा महिन्यांत ?

By admin | Updated: December 22, 2015 00:30 IST

तीनहातनाका येथील इटर्निटी मॉलशेजारी असलेल्या महापालिकेच्या आरक्षित भूखंडावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाला महासभेने मंजुरी दिली

ठाणे : तीनहातनाका येथील इटर्निटी मॉलशेजारी असलेल्या महापालिकेच्या आरक्षित भूखंडावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाला महासभेने मंजुरी दिली असून येत्या सहा महिन्यांत त्याचे काम पूर्ण होईल, असा पालिकेचा दावा आहे. सध्या त्याच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू आहे. या स्मारकाच्या ठिकाणी अ‍ॅम्पी थिएटर, प्रदर्शन हॉल आदींसह विविध वास्तू या एकाच छताखाली जुन्यासह नव्या कलाकारांसाठी उपलब्ध होणार आहेत. या कामासाठी ११ कोटी १२ लाख ४६ हजार ५२९ रुपयांचा खर्च केला जाणार आहे. तीनहातनाका भागात हे स्मारक व्हावे, यासाठी स्थायी समितीचे सभापती नरेश म्हस्के यांच्यासह सर्वपक्षीयांचा पुढाकार लाभल्याने ते आता खऱ्या अर्थाने मार्गी लागत असल्याची भावना म्हस्के यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. एका वर्षाच्या आत हे स्मारक उभे राहणार आहे. प्रभाग क्र. ३७ मध्ये ते उभारले जाणार असून पिरॅमिड आकाराची इमारत येथे उभारली जाणार आहे. तळ अधिक दोन मजल्यांची ही अ‍ॅनेक्स इमारत असणार आहे. इमारतीच्या आवारातच बाळासाहेबांचे ४२ फुटी स्मारक उभारले जाणार असून ३० हजार चौरस फुटांवर ही दुमजली पिरॅमिड वास्तू उभारली जाणार आहे.दुसऱ्या टप्प्यात विद्युत, रंगरंगोटी आणि इतर पायाभूत सुविधांची कामे केली जाणार आहेत. त्यानुसार, या कामाला शनिवारी झालेल्या महासभेत मंजुरी मिळाली असून हे काम आता लवकरच सुरू होणार आहे. पुढील पाच ते सहा महिन्यांत हे काम पूर्ण होऊन ठाण्यासह मुंबई व जिल्ह्यातील नव्याजुन्या कलावंतांसाठी या स्मारकाच्या माध्यमातून एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.