शहरं
Join us  
Trending Stories
1
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
2
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
5
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
6
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
7
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
8
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
9
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
10
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
11
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
12
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
13
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
14
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
15
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
16
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
17
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
18
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
19
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
20
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

आरटीओकडील जप्तीतल्या रिक्षांचा लिलाव

By admin | Updated: July 2, 2017 06:26 IST

विविध कारणांनी आरटीओने जप्त केलेल्या रिक्षांचा लिलाव केला जाणार आहे. आरटीओच्या जप्तीत असलेल्या या रिक्षा अनेक वर्षांपासून

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : विविध कारणांनी आरटीओने जप्त केलेल्या रिक्षांचा लिलाव केला जाणार आहे. आरटीओच्या जप्तीत असलेल्या या रिक्षा अनेक वर्षांपासून पडून असल्यामुळे, त्या जीर्ण स्थितीत आहेत. यामुळे जागा अडवली जात असल्याने त्या लिलावात काढण्याचा निर्णय आरटीतर्फे घेतला आहे.जप्त केलेल्या वाहनांची साठवणूक करण्यासाठी शहरात पोलीस व आरटीओ यांना जागेची कमतरता भासत आहे. याच समस्येने सध्या आरटीओ अधिकारी ग्रासले आहेत. वाहन परवाना चाचणीसाठी असलेल्या मैदानाच्याच काही भागात विविध कारणांनी जप्त केलेल्या वाहनांची साठवणूक करावी लागत आहे. मागील काही वर्षांत जप्त केलेली अनेक वाहने त्या ठिकाणी पडून आहेत. त्यामध्ये ३९ रिक्षांचा समावेश आहे. यामुळे जागेची अडवणूक होऊन चाचणीचे मैदान विद्रूप झाले आहे. शिवाय वर्षानुवर्षे पडून असलेली वाहने जीर्ण झाल्याने नादुरुस्त स्थितीत आहेत. यामुळे वाहनांचे नुकसान होत असून त्याचे मूल्य कमी होत चालले आहे; परंतु जप्तीत असलेल्या वाहनांच्या मालकांनी अद्यापही ती ताब्यात घेण्यासाठी आरटीओकडे पाठपुरावा केलेला नाही. त्यामुळे ही वाहने लिलावात काढण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आरटीओ अधिकारी संजय डोळे यांनी कळवले आहे. त्याकरिता जिल्हा दंडाधिकारी यांची रीतसर परवानगी घेतली जाणार आहे. त्यापूर्वी संबंधितांनी दहा दिवसांत आरटीओकडे योग्य कागदपत्रांची पूर्तता करून त्यांचे वाहन ताब्यात घेण्याचे आवाहन आरटीओतर्फे करण्यात आले आहे.