शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
2
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
3
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
4
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
5
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
6
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
7
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
8
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
9
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
10
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
11
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
12
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
13
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
14
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
15
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
16
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
17
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
18
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
19
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
20
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...

अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरण; राजू पाटील याचा जामीन पुन्हा फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2021 12:42 PM

जामीन अर्ज फेटाळताना न्यायमूर्ती प्रभू-देसाई यांनी असे निरीक्षण नोंदविले की, आरोपी नंबर एक अभय कुरुंदकर व त्याचे अन्य साथीदार आरोपी यांनी अश्विनी यांचा मृतदहे कापून त्याचे तुकडे करुन फ्रीजमध्ये ठेवून नंतर मृतदेह वसई खाडीत टाकला.

पनवेल : अश्विनी बिद्रे हत्याकांडातील आरोपी तसेच माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा भाचा राजू पाटील उर्फ ज्ञानदेव पाटील याचा मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी दुसऱ्यांदा जामीन अर्ज फेटाळला आहे. न्यायमूर्ती अनुजा प्रभू-देसाई याच्यासमोर जामीन अर्जबाबतची सुनावणी १५ रोजी पूर्ण झाली.

 जामीन अर्ज फेटाळताना न्यायमूर्ती प्रभू-देसाई यांनी असे निरीक्षण नोंदविले की, आरोपी नंबर एक अभय कुरुंदकर व त्याचे अन्य साथीदार आरोपी यांनी अश्विनी यांचा मृतदहे कापून त्याचे तुकडे करुन फ्रीजमध्ये ठेवून नंतर मृतदेह वसई खाडीत टाकला. राजू याने पहिला जामीन अर्ज २०१८ चा  दाखल केला होता. तो २८ सप्टेंबर २०१८ रोजी मी रद्द करण्यात आला होता. देशात लॉकडाऊन असतानाही  न्यायालयाने साक्षीदार तपासले आहेत. आरोपीचे वकीलसुध्दा या काळात हजर होते. हे रोजनाम्यावरून दिसते. त्यामुळे खटल्याला उशीर झाला असल्याचे कारण योग्य नसल्याचे सांगत. त्यामुळे न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्याचे स्पष्ट केले आहे.

विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी कोर्टासमोर सांगितले की, सरकार पक्षाकडून कोणत्याही प्रकारचा उशीर झालेला नाही आणि वेळेवर सुनावणी सुरू आहे. आरोपी जाणीवपूर्वक उशीर केल्याचे कारण कोर्टासमोर ठेवून न्यायालयाची दिशाभूल करीत असल्याचे सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीeknath khadseएकनाथ खडसेRaju Patilराजू पाटील