शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

महापौरपदासाठी अर्ज दाखल

By admin | Updated: July 7, 2017 04:28 IST

पनवेल महानगरपालिकेच्या पहिल्या महापौरपदी कोण विराजमान होणार? याची अनेकांना प्रतीक्षा लागली होती. गुरुवारी भाजपातर्फे डॉ. कविता

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या पहिल्या महापौरपदी कोण विराजमान होणार? याची अनेकांना प्रतीक्षा लागली होती. गुरुवारी भाजपातर्फे डॉ. कविता चौतमल, तर शेकापतर्फे हेमलता गोवारी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. पक्षीय बलाबल पाहिले असता, भाजपाच्या डॉ. कविता चौतमल यांच्या नावाचे पारडे जड आहे. सोमवार, १० जुलै रोजी विशेष महासभेत त्यांच्या नावाची घोषणा होईल. उपमहापौरपदासाठी भाजपाच्या पनवेल नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष चारुशीला घरत तर शेकापच्या वतीने रवींद्र भगत यांनी अर्ज दाखल केला आहे. पनवेल पालिकेची निवडणूक २४ मे रोजी पार पडली. यात ७८पैकी ५१ जागा भाजपाला मिळाल्याने भाजपाची एकहाती सत्ता पनवेल महापालिकेत आली. शेकाप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी महाआघाडीला २७ जागा मिळाल्या. भाजपाच्या गोटातून महापौर होणार हे त्या वेळी पक्के झाले होते. मात्र, विविध कारणांमुळे ही निवडणूक एक महिन्याहून अधिक कालावधी उलटला, तरी लांबणीवर पडली होती. त्यात भाजपाच्या वतीने महापौरपदाच्या उमेदवारांची नावे गुप्त ठेवली होती. मात्र, डॉ. कविता चौतमल यांच्या नावाची चर्चा होती. भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या आरपीआयमधून भाजपाच्या कमळावर निवडून आलेल्या आरपीआय जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड यांच्या बहीण विद्या गायकवाड यांचे नावही शर्यतीत होते. मात्र, अखेर चौतमल यांना पक्षाने उमेदवारी दिल्याने पनवेलच्या महापौरपदाचे चित्र स्पष्ट झाले आहे. डॉ. कविता चौतमल या पेशाने डॉक्टर असून, त्यांचे पती किशोर चौतमल हे आमदार प्रशांत ठाकूर यांचे निकटवर्तीय असल्याचे बोलले जात आहे. डॉ. चौतमल या प्रभाग १६मधून निवडून आल्या आहेत. शेकापमधून हेमलता गोवारी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. गोवारी या कामोठे ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच आहेत. पनवेल महानगरपालिकेची विशेष महासभा सोमवार, १० जून रोजी आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पार पडणार आहे. या वेळी पीठासीन अधिकारी निवडणुकीच्या आधारे महापौरांची घोषणा करतील. महापौर, उपमहापौरपदाच्या उमेदवारी अर्जासह स्वीकृत नगरसेवकपदाच्या उमेदवारांनीदेखील अर्ज दाखल केले आहेत.