शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेसाठी युती झाली असली तरी सेना-भाजपात कुरघोड्या सुरुच!

By admin | Updated: November 30, 2015 02:17 IST

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत सत्तेसाठी शिवसेना आणि भाजपामध्ये समझोता झाला असला तरी, राज्य पातळीवर त्यांच्यातील दुरावा अद्यापही कमी झालेला नाही

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत सत्तेसाठी शिवसेना आणि भाजपामध्ये समझोता झाला असला तरी, राज्य पातळीवर त्यांच्यातील दुरावा अद्यापही कमी झालेला नाही. ठाणे, भिवंडी आदी ठिकाणी झालेल्या विविध कार्यक्रमांना भाजपाने हायजॅक केल्याने शिवसेनेच्या नेत्यांनी या कार्यक्रमांना दांडी मारली. परंतु आता या दोन्ही पक्षांमधील दुरावा आणखीनच वाढणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. आगामी काळात कल्याण डोंबिवलीप्रमाणेच ठाण्यातही शिवसेनेला आपली ताकद दाखवून देण्याकरिता भाजपाने एकला चलो रे चा नारा दिला आहे. एकूणच शिवसेना भाजपामधील ही खडाखडी आगामी ठाणे महापालिका निवडणुकीत वाढणार व परस्परांमध्ये दुरावा निर्माण करणारी ठरणार आहे.कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत कॉंग्रेस, राष्ट्रवादी आघाडी करून लढली. परंतु शिवसेना, भाजपाने येथे वेगळी चूल मांडून निवडणूक लढविली. निवडणुकीचा प्रचार शिगेला गेल्यानंतर शिवसेना भाजपाच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फेऱ्या झडल्या. परिणामी त्यांच्यात दुरावा निर्माण झाला. या निवडणुकीत भाजपा ३५ जागांपर्यंत मजल मारेल अशी आशा होती. परंतु त्यांनी थेट ४२ जागांवर मजल मारली. त्यामुळे शिवसेनेचे एकहाती सत्तेचे स्वप्न भंगले. अखेरच्या क्षणी समझोता झाला आणि शिवसेना, भाजपा सत्तेत एकत्र आले. परंतु त्यांच्यातील दुरावा आजही कायम आहे.कल्याण-डोंबिवलीत केवळ सत्तेसाठी समझोता झाला आहे. युतीमधील दुरावा एक्स्प्रेस आगामी काळात धावणार असल्याचे ठाण्यातील शिवसेना आणि भाजपाचे नेते खासगीत सांगत आहेत. कल्याण डोंबिवलीचा स्वबळाचा फॉर्म्युला यशस्वी झाल्याने, ठाण्यातही भाजपा त्या फॉर्म्युल्यावर ठाम असून एकत्र लढलो तर उपमहापौर, स्थायी आणि इतर काही समित्या मिळतील. परंतु आपली ताकद किती आहे ते सिध्द होणार नसल्याने हा दुरावा असाच कायम राहावा म्हणून, भाजपाने आतापासून मोर्चेबांधणी सुरु केली आहे. भाजपाला आपल्या राजकीय फायद्याकरिता शिवसेनेशी फटकून वागायचे असले तरी काही स्थानिक नेते तसे होऊ नये याकरिता प्रयत्नशील आहेत. मात्र ठाण्यातील निवडणुकीत वेगळी चूल मांडून जमल्यास एकहाती सत्ता अथवा, अर्धाकाळ सत्ता मिळवायची अशी गणिते भाजपाकडून पक्की केली जात आहेत. भाजपाला शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातील आपली शक्ती अजमावून पाहायची आहे तर शिवसेना आपल्याला भाजपा या जुन्या मित्राकडून वरचेवर दगाफटका केला जात असल्याचे दाखवून मतदारांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे.