शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

नियम डावलून शालेय साहित्याचे वाटप

By admin | Updated: March 20, 2017 02:19 IST

५ डिसेंबर २०१६ रोजी आलेल्या शासन निर्णयानुसार महापालिका शाळेतील मुलांचे आणि वडिलांचे बँक खाते उघडणे बंधकारक

नवी मुंबई : ५ डिसेंबर २०१६ रोजी आलेल्या शासन निर्णयानुसार महापालिका शाळेतील मुलांचे आणि वडिलांचे बँक खाते उघडणे बंधकारक असून या खात्यात शालेय साहित्याकरिता लागणारी रक्कम जमा होणार आहे. मात्र शासन नियमांचे उल्लंघन करत शाळांमध्ये गणवेशाचे वाटप सुरु असल्याचा प्रकार शनिवारी झालेल्या स्थायी समितीतच्या बैठकीत उघडकीस आला. अनेक शाळांमध्ये ठेकेदारांकडून शालेय गणवेश पुरविले जात असून त्याचे अधिकार कुणी दिलेत, असा जाब शिक्षण विभागाला विचारण्यात आला.शहरातील काही विभागांमधील शाळांमध्ये आतापर्यंत ६० टक्के शालेय गणवेशाचे वाटप झाल्याची माहिती नगरसेवक जे.डी. सुतार यांनी दिली. शासन निर्णयाला केराची टोपली दाखवत शिक्षण विभागाचा मनमानी कारभार सुरु असल्याची प्रतिक्रिया सदस्यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांना कोणत्या पुरवठादाराकडून शालेय साहित्य खरेदी करावे याचे बंधन नसून प्रत्यक्षात मात्र शाळांमध्ये ठेकेदाराकडून साहित्य पुरविले जात असल्याने शासनाचा हा निर्णय फसल्याचे प्रतिक्रिया नगरसेवक एम.के. मढवी यांनी व्यक्त केली. पालकांनी खरेदी केलेल्या साहित्याचे बिल कच्चे असेल अथवा पक्के याबाबत अजूनही शिक्षण विभागाचा निर्णय झालेला नसल्याची टीका यावेळी करण्यात आली. शिक्षणाधिकारी संदीप सांगवी यांनी याबाबत कसलीही तक्रार न आल्याचे स्पष्ट करत शिक्षण विभागाची बाजू मांडली. मात्र सदस्यांनी ते धुडकावून लावत सभागृहाची दिशाभूल करत असल्याचा आरोप करण्यात आला. विद्यार्थ्यांचे बँक खात्याबाबत माहिती मागितली असता ३९,००० विद्यार्थ्यांपैकी २८,००० विद्यार्थ्यांनी संयुक्त बँक खाते उघडल्याचे प्रतिपादन शिक्षणाधिकाऱ्यांनी केले. अशा अधिकाऱ्यांना प्रशासन पाठीशी घालत असल्याची टीका सभापती शिवराम पाटील यांनी केली. ज्या शाळांमध्ये शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले आहे अशा शाळेच्या मुख्याध्यापकांवर काय कारवाई केली जाणार, असा प्रश्न सुतार यांनी उपस्थित केला. (प्रतिनिधी)