शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

पनवेल प्रांताधिकाऱ्यांविरोधात वकिलांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 11:36 PM

कार्यपद्धतीबाबत नोंदविला आक्षेप; न्यायालयीन दाव्यांवर सुनावणी न करण्याची मागणी

कळंबोली : पनवेलचे प्रांताधिकारी दत्तात्रय नवले यांच्याविरोधात वकील संघटनेने दंड थोपटले आहेत. त्यांनी नवले त्यांच्या न्यायालयीन कार्यपद्धतीवर आक्षेप घेत सोमवारी पनवेलमध्ये वकीलांनी प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. तर संघटनेद्वारे तीव्र संताप या ठिकाणी व्यक्त केला. त्यापुढे पनवेलमध्ये दाव्यांवर सुनावणी घेऊ नये, अशी मागणी वकिलांनी यावेळी केली.महसुली दावे हे तहसीलदार आणि त्यानंतर प्रांताधिकारी यांच्याकडे चालतात. वादी प्रतिवादी त्यांच्यासमोर युक्तिवाद करतात. तहसील कार्यालयात निकाल लागल्यानंतर समाधानकारक निकाल न मिळाल्यानंतर प्रांत अधिकाऱ्यांकडे अपील केले जाते. ते याप्रकरणाची सुनावणी घेऊन निकाल देतात. एक प्रकारे येथे न्यायालयीन प्रक्रिया चालते. प्रांताधिकारी न्यायदंडाधिकारी असतात. त्यांच्याकडे अनेक महसुली दाव्यांच्या प्रकरणाची सुनावणी होते. पनवेलचे प्रांताधिकारी दत्तात्रेय नवले यांच्या कार्यपद्धतीवर पनवेल तालुका वकील संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे. नवले यांच्याकडून पक्षकारांना न्याय मिळू शकत नाही. त्यामुळे त्यांच्याकडे सुनावणी केली जाऊ नये, असा ठराव वकील संघटनेच्यावतीने अगोदरच करण्यात आला आहे.पनवेलचे प्रांत अधिकारी मनमानी करतात. तसेच वकिलांचा अपमान करीत असल्याचा आरोप संघटनेच्यावतीने करण्यात आला आहे. त्यांच्याकडून न्यायालयीन मर्यादा राखली जात नसल्याचेही संघटनेच्या सभासदांचे म्हणणे आहे. याविरोधात संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड मनोज भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली प्रांत अधिकाºयावर कार्यालयावर वकिलांनी मोर्चा काढला. पनवेल तालुक्यात प्रांताधिकारी सारख्या अधिकारी विरोधात पहिल्यांदाच वकिलांना मोर्चा काढला.माझ्या कार्यालयात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित आहे. आपण कोणतीही मनमानी करीत नाही, तसेच वकिलांचा अपमान करण्याचाही विषय येत नाही. न्यायालयीन मर्यादा सांभाळून हे कामकाज सुरू असते. काही वकिलांच्या विरोधात निकाल गेल्याने त्यातून अशा गोष्टी घडल्या आहेत.- दत्तात्रय नवले, प्रांताधिकारी, पनवेलपनवेलचे प्रांत अधिकारी हे न्यायदंडाधिकारी आहे, परंतु ते न्यायालयीन मर्यादा पाळत नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. ते वकिलांना अपमानित करतात, तसेच मनमानी कारभार करतात. त्यामुळे त्यांच्याकडून पक्षकारांना न्याय मिळेल ही अपेक्षा उरली नाही. यापुढे महसुली न्यायालयीन दावे त्यांच्याकडे आम्ही चालविणार नाही. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाºयांकडे ही वकील संघटनेने तक्रार केली आहे.- अ‍ॅड. मनोज भुजबळ,अध्यक्ष, पनवेल तालुका वकील संघटना.