शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

सात गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई

By admin | Updated: July 5, 2017 06:45 IST

चार पोलीस ठाणेअंतर्गत सात गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. फसवणूक, अवैध सावकारी, मारामारी तसेच खंडणी

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : चार पोलीस ठाणेअंतर्गत सात गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. फसवणूक, अवैध सावकारी, मारामारी तसेच खंडणी अशा गुन्ह्यांची त्यांच्यावर नोंद आहे. या कारवाईअंतर्गत सातही जणांना दोन वर्षांकरिता शहरातून हद्दपार करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत.गंभीर स्वरूपाचे गुन्हे नियंत्रित करण्याच्या अनुषंगाने नवी मुंबई पोलिसांनी पाऊल उचलले आहे. यानुसार परिमंडळ-१मधील सात जणांवर हद्दपारीचे आदेश काढण्यात आले आहे. अवैध शस्त्र बाळगणे, दुखापत, घरफोडी, फसवणूक, अवैध सावकारी, मारामारी अशा प्रकारचे गुन्हे असलेल्यांच्या हालचालींवर परिमंडळ १ चे उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे यांच्या सूचनेनुसार गुप्त पाळत ठेवण्यात आली होती. यादरम्यान विविध पोलीस ठाण्याअंतर्गत सात गुन्हेगारांच्या गुन्हेगारी हालचाली सुरू असल्याचे आढळून आले. यासंदर्भाचा अहवाल तयार करून तो पोलीस आयुक्तांकडे सादर करून त्यांना तडीपार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. या प्रस्तावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर किशोर गायकवाड याच्यावर फसवणूक व अवैध सावकारीचे १३ गुन्हे दाखल आहेत, तर सुरेश पाटील याच्यावर घरफोडीचे सात तर दुखापतीचा एक गुन्हा आहे. सुरेश पारकर याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, तसेच मारामारी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याशिवाय आनंद म्हेत्रे, नवनाथ अडांगळे, रूपेश जोशी व फिरोज शेख या तिघांवरही तितकेच गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याविरोधात रबाळे एमआयडीसी, कोपरखैरणे, नेरुळ व रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. भविष्यात त्यांच्याकडून गुन्हेगारी कारवाया वाढू नयेत, याकरिता त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई करण्यात आल्याचे सहआयुक्त प्रशांत बुरडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. याप्रसंगी उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे, सहायक आयुक्त प्रदीप जाधव यांच्यासह सर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक उपस्थित होते.प्रस्तावावर शिक्कामोर्तबसातही सराईत गुन्हेगारांना हद्दपारीचे आदेश काढण्यात आले आहेत. त्यामध्ये आनंद अंगद म्हेत्रे (रबाळे एमआयडीसी), सुरेश यशवंत पाटील (दिघा), किशोर गवऱ्या गायकवाड (खैरणे गाव), सुरेश पांडुरंग पारकर (कोपरखैरणे), नवनाथ एकनाथ अडांगळे (कोपरखैरणे), रूपेश चंद्रकांत जोशी (शिरवणे) व फिरोज नजिर अहमद शेख (तळवली गाव) अशी हद्दपार झालेल्यांची नावे आहेत.