शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा रेतीउपशावरील कारवाई नाटकी ?

By admin | Updated: October 5, 2015 00:19 IST

ठाण्यात कोलशेत, नागलाबंदर, कावेसर, गायमुख, घोडबंदर, मुंब्रा, दिवा खाड्यांतून रेतीउपसा करण्याचा व्यवसाय केला जातो.

घोडबंदर : ठाण्यात कोलशेत, नागलाबंदर, कावेसर, गायमुख, घोडबंदर, मुंब्रा, दिवा खाड्यांतून रेतीउपसा करण्याचा व्यवसाय केला जातो. तिच्या उत्खननासाठी महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाने निश्चित केलेल्या खोलीपेक्षा जास्त तसेच तीन मीटरच्या अधिक खोल जागेतून रेती काढणे आणि मर्यादित वेळेनुसारच ती काढण्यास मान्यता आहे. मात्र, हे नियम अटी-शर्ती पायदळी तुडवून बेकायदा उपसा सुरू असल्याने पर्यावरणाला मोठा धोका उत्पन्न झाला आहे. महसूल विभागाकडून रेकॉर्ड नोंदीसाठी घातलेल्या धाडी या तात्पुरती मलमपट्टी ठरत असल्याने हा व्यवसाय पुन्हा राजरोसपणे सुरू होत असल्याचे दिसून येत आहे.कारवाईच्या धाडसत्रामुळे महसूल आणि पोलिसांचा हप्ता वाढण्यास हातभार लागत असल्याचे जाणकार सांगतात. देशात महागाईचा जोर वाढल्यामुळे रेती व्यवसायदेखील तेजीत आला आहे. मागील वर्षी असलेल्या दरात व या वर्षीच्या दरात मोठी तफावत आहे. मागील वर्षी खाडीच्या रेतीसाठी एका ट्रकला १२ हजार मोजावे लागत होते. त्यासाठी आता १८ हजारांहून अधिक रक्कम द्यावी लागत आहे. दर्जेदार बांधकामासाठी खाडीऐवजी नदीच्या रेतीला मान्यता आहे. तिचा दर सोन्याहून जास्त झाला आहे. तीन ते चार ब्रास साठी ४० ते ५० हजार रु पये आकारले जात आहेत. रेतीचे दर निश्चित नसल्याने मन मानेल असे दर उकळले जात आहेत. विशेष म्हणजे तिची वाहतूक करताना चिरीमिरी आणि हप्त्यांचे वाटप जेवढे जास्त, तसा दर वाढवला जात आहे. विनापरवाना रेती काढणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करून रेती काढण्यासाठी वापरलेले साहित्य जप्त करण्यात येते. बहुतेकवेळा गुन्हे दाखल करताना अज्ञात व्यक्तीविरोधातच ते दाखल करण्याची किमया साधली जाते. यामागे अर्थकारण दडले असल्याचा आरोप केला जात आहे.