शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
4
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
5
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
6
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
7
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
8
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
9
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
10
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
11
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
12
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
13
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
14
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
15
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
16
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
17
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
18
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
20
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

ओएनजीसीच्या विरोधातील सर्वपक्षीय 9 आंदोलनकर्त्यांची निर्दोष मुक्तता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2023 10:53 IST

९ ऑगस्ट २०२१ रोजी उरण पोलिसांनी उरण न्यायालयात खटलाही दाखल केला होता.

मधुकर ठाकूर 

उरण : नागाव -म्हातवली प्रकल्पग्रस्त बेरोजगार संघटनेच्यावतीने ओएनजीसी विरोधात परिसरातील प्रकल्पग्रस्त्त तरुणांना  कंत्राटी पद्धतीने चालणाऱ्या कामात नोकऱ्या मिळाव्यात यासाठी सर्व पक्षीय आंदोलनकर्त्यांवर दाखल करण्यात आलेल्या खटल्यातून नऊही आंदोलनकर्त्यांची उरण न्यायालयाने शुक्रवारी अडीच वर्षांनंतर निर्दोष मुक्तता केली आहे.  

नागाव-म्हातवली परिसरातील बेरोजगार तरुणांना ओएनजीसी प्रकल्पात ठेकेदारी पध्दतीने चालणाऱ्या कामात सामावून घेण्याच्या मागणीसाठी नागाव -म्हातवली प्रकल्पग्रस्त बेरोजगार संघटनेच्या वतीने ओएनजीसी विरोधात आंदोलन छेडले होते. आंदोलनानंतर संघटना आणि ओएनजीसी प्रशासन अधिकाऱ्यांच्या बैठकीत आठ बेरोजगार तरुणांना कामावर घेण्याचे मान्यही केले होते.मात्र ओएनजीसीने  दिलेले आश्वासन मुदतीनंतरही पाळले नाही. यामुळे संतप्त झालेल्या नागाव -म्हातवली प्रकल्पग्रस्त बेरोजगार संघटनेच्या वतीने ओएनजीसी विरोधात आंदोलन छेडले होते.मात्र कोवीड नियमांचा भंग केल्याचा ठपका ठेवून उरण पोलिसांनी सर्वपक्षीय संघटनेच्या एस. के. पुरो, जनार्दन थळी, भारतराज थळी, जितेंद्र ठाकूर, निलेश कोर्लेकर, घनश्याम ठाकूर, विलास पाटील, राजेश पाटील आदी नऊ पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

९ ऑगस्ट २०२१ रोजी उरण पोलिसांनी उरण न्यायालयात खटलाही दाखल केला होता. या खटल्याची मागील अडीच वर्षांपासून सुनावणी सुरू होती.या खटल्याचे कामकाज उरण पंचायत समितीचे माजी सभापती ॲड.सागर कडू ,ॲड. रोहन नाखवा,ॲड. जितेंद्र कात्रने,ॲड.अनुराग ठाकूर या वकील मंडळीने कोणताही आर्थिक मोबदला न घेता  नागाव -म्हातवली प्रकल्पग्रस्त संघटेनेच्या आरोपी पदाधिकाऱ्यांची सुनावणी दरम्यान न्यायालयात भक्कमपणे बाजु मांडली.अखेर याप्रकरणी सुनावणी नंतर उरण न्यायालयाने शुक्रवारी अडीच वर्षांनंतर नऊही आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.अशी माहिती ॲड.सागर कडू यांनी निकालानंतर दिली. याप्रकरणी उरण न्यायालयात मागील अडीच वर्षांपासून खटला सुरू असताना  मानसिक पाठबळ देणारे ग्रामस्थ ,मोफत खटला लढविणारे वकील मंडळी या सर्वांचे नागाव -म्हातवली प्रकल्पग्रस्त बेरोजगार संघटनेचे नेते काका पाटील यांनी ॠण व्यक्त केले. अखेर सत्याचाच विजय झाला असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHigh Courtउच्च न्यायालयONGCओएनजीसी