शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात अमली पदार्थांचे ४४ तस्कर ताब्यात

By admin | Updated: October 1, 2015 01:51 IST

गेल्या वर्षभरात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने यासंबंधी ३० गुन्हे नोंदविले आहेत. त्यामध्ये ४४ आरापींना अटक केली आहे

जितेंद्र कालेकर, ठाणेगेल्या वर्षभरात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने यासंबंधी ३० गुन्हे नोंदविले आहेत. त्यामध्ये ४४ आरापींना अटक केली आहे. एकट्या कळवा आणि मुंब्रा परिसरातून जून २०१४ ते सप्टेंबर २०१५ या कालावधीत २० गुन्हे दाखल झाले आहेत. यात ३४ जणांना अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंदार धर्माधिकारी यांनी दिली. केवळ मुलेच नव्हे तर मुलींनाही या एमडीचे प्रलोभन दाखवून त्यांना या जाळ्यात ओढले जात आहे. त्यामुळे पोलिसांप्रमाणेच पालक आणि शिक्षकांनी अधिक जागृकता दाखविणे गरजेचे आहे.पूर्वी एमडीचे सेवन करणाऱ्यांवर किंवा ती विकणाऱ्यांवर एनडीपीएस अर्थात (नार्कोटीक्स ड्रग्ज अ‍ॅन्ड सायकोट्रोपिक सबस्टन्स अ‍ॅक्ट) अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत कारवाई होत नव्हती. गेल्या काही दिवसांमध्ये एमडीच्या आहारी जाणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढल्याने तसेच त्याचे दुष्परिणामही तीव्र असल्याने त्याची विक्री करणाऱ्यांवर एनडीपीएस ची कारवाई होण्यासाठी मुंब्रा भागातून मोठी चळवळ उभी राहिली. ठाणे पोलिसांनीही एमडीचा अंमली पदार्थांमध्ये समावेशाचा प्रस्ताव पाठविला होता. त्याचीच परिणीती म्हणून २४ फेब्रुवारी २०१५ रोजी एमडीचा एनडीपीएस अ‍ॅक्टमध्ये समावेश करण्यात आला. याअंतर्गत मुंब्रा भागातून हसन अपसर कुरेशी उर्फ अजीज सय्यद (४०) याच्यावर धर्माधिकारी यांच्या पथकाने राज्यात पहिलीच कारवाई केली. पूर्वी अंमली पदार्थांमध्ये समावेश नसल्याने आरोपीला लवकर जामीन मिळायचा. त्यानंतर लगेच तो हाच ‘उद्योग’ करायचा. आता ५० ग्रॅमपेक्षा अधिक प्रमाणात एमडी मिळाल्यावर व्यापारी मात्राचे प्रमाण गृहीत धरुन विक्रीसाठीची कारवाई केली जाते,असे एका अधिकाऱ्याने सांगितले.