शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

शहरात स्वाइनचे ५ रुग्ण

By admin | Updated: July 8, 2017 06:06 IST

नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये एप्रिलपासून एकूण ३३ संशयित रु ग्ण आढळून आले. त्यापैकी ५ रुग्ण रुग्णालयांत

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये एप्रिलपासून एकूण ३३ संशयित रु ग्ण आढळून आले. त्यापैकी ५ रुग्ण रुग्णालयांत उपचार घेत असून, त्यांची प्रकृती उपचारायोग्य आहे. या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील ३८ व्यक्तींचीही तपासणी करून आवश्यक उपचार करण्यात आले आहेत.संशयित रुग्णांपैकी १९ रु ग्णांचे थ्रोट स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी १२ रु ग्णांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या १२ पॉझिटिव्ह रुग्णांना रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उचित उपचार करण्यात आले असून, यापैकी ७ रुग्ण पूर्णत: बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागांतर्गत कार्यान्वित असलेली वाशी, ऐरोली व नेरुळ येथील रुग्णालये, बेलापूर येथील माता बाल रुग्णालय, सर्व नागरी आरोग्य केंद्रे यांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची सभा घेऊन त्यांना स्वाइन फ्लू आजाराबाबत तांत्रिक मार्गदर्शन देण्यात आले. त्याचप्रमाणे नागरी आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे याबाबत विशेष प्रशिक्षण घेण्यात आले आहे. प्रशिक्षणामध्ये स्क्रिनिंग सेंटरमध्ये जास्तीत जास्त संशयित रु ग्णांचा शोध घेऊन त्यानुसार कार्यवाही करण्याचे आदेश आरोग्य विभागामार्फत देण्यात आले आहेत. महानगरपालिकेकडे यासाठीचा आवश्यक औषधसाठा व उपकरणे उपलब्ध असल्याची माहिती आरोग्य विभागाचे डॉ. दीपक परोपकारी यांनी दिली. सार्वजनिक रुग्णालय वाशी येथे ८ आणि डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय नेरु ळ येथे ५ खाटांचा स्वतंत्र कक्ष संशयित स्वाइन फ्ल्यू रुग्ण उपचारासाठी सुरू करण्यात आला आहे.शाळेतील मुख्याध्यापकांनाही दिले प्रशिक्षणमहापालिका कार्यक्षेत्रातील खासगी, वैद्यकीय, व्यावसायिक व महानगरपालिकेच्या शाळांतील सर्व मुख्याध्यापक यांचेही मुख्यालय स्तरावर प्रशिक्षण घेण्यात आले आहे. महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळा, महाविद्यालये यांचे प्राचार्य, मुख्याध्यापक यांना स्वाइन फ्लूच्या अनुषंगाने शाळा, महाविद्यालयांमध्ये घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन करणारे परिपत्रक देण्यात आले आहे. नागरिकांमध्ये स्वाइन फ्लू आजाराबाबत प्रतिबंधक उपाययोजनांची माहिती पोहोचावी, याकरिता वर्तमानपत्रे, सोशल मीडियाद्वारे सातत्यपूर्ण आवाहन करण्यात येत आहे. तसेच जनमाहितीपर दोन लाखांहून अधिक हस्तपत्रके वितरित करण्यात आली आहेत. शहरातील महत्त्वाच्याठिकाणी पोस्टर्स व बॅनर्स लावण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.