आयआयटी मुंबईच्या ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू; सूर्योदय पॉईंट पाहून परतताना मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 06:53 IST2026-03-20T06:53:00+5:302026-03-20T06:53:36+5:30
हा भीषण अपघात मुंबई-पुणे महामार्गावर गुरुवारी पहाटे झाला.

आयआयटी मुंबईच्या ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू; सूर्योदय पॉईंट पाहून परतताना मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात
नवीन पनवेल : लोणावळा येथे सूर्यादय पाहून मुंबईत परतताना झालेल्या भीषण अपघातामध्ये आयआयटी मुंबईच्या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. ओमकुमार बोरसे (२३, नाशिक) लय देशभ्रतार (२२, नागपूर) आणि श्रेयांश शर्मा (२२, जयपूर) अशी मृतांची नावे आहेत. हा भीषण अपघात मुंबई-पुणे महामार्गावर गुरुवारी पहाटे झाला.
आयआयटी पवई, मुंबई येथील ओमकुमार बोरसे, श्रेयांश शर्मा, लय देशभ्रतार, हितेश कुमार मीना, सोहम चव्हाण, सिद्धांत जेबल हे सहा विद्यार्थी १८ मार्चला रात्री चित्रपट पाहून पहाटे सूर्योदय पॉईंट पाहण्यासाठी कारने मुंबईहून लोणावळ्याला गेले होते. परतीच्या प्रवासात भाताण बोगदा ओलांडल्यानंतर त्यांनी लेन क्रमांक तीनवरील कंटेनरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला असता कार कंटेनरवर धडकली. या भीषण अपघातामध्ये कारमधील ओमकुमार, श्रेयांश आणि लय यांचा मृत्यू झाला, इतर तिघे जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल केले असून, या प्रकरणाची पनवेल तालुका पोलिसांनी नोंद केली आहे.