शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
5
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
8
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
9
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
10
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
12
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
13
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
14
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
15
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
16
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
17
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
18
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
19
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
20
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

खाडीपुलाचे काम रखडणार, २९८ कोटींचा प्रस्ताव स्थगित

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2020 00:21 IST

नवी मुंबईमधील रखडलेल्या प्रकल्पांमध्ये घणसोली ते ऐरोली खाडीपुलाचा समावेश आहे.

नवी मुंबई : पामबीच मार्गावर घणसोली ते ऐरोली दरम्यान खाडीपूल बांधण्याचा २९८ कोटी ९९ लाख रुपयांचा प्रस्ताव प्रशासनाने सर्वसाधारण सभेत मांडला होता. पुलाच्या बांधकामासाठी ५० टक्के रक्कम देण्याचे सिडकोने यापूर्वी मान्य केले होते. हा निधी गृहीत धरून प्रस्ताव तयार केला होता; परंतु दोन दिवसांपूर्वी १२५ कोटी रुपये काम झाल्यावर देण्याचे पत्र सिडकोने दिले आहे. यामुळे सर्वसाधारण सभेमध्ये हा प्रस्ताव स्थगित केला आहे.नवी मुंबईमधील रखडलेल्या प्रकल्पांमध्ये घणसोली ते ऐरोली खाडीपुलाचा समावेश आहे. सिडकोने या पुलाचे बांधकाम करणे अपेक्षित होते; परंतु खारफुटीचा अडथळा आल्यामुळे ते वेळेत होऊ शकले नाही. दरम्यान, घणसोली नोड हस्तांतराची मागणी वाढू लागली. अखेर १४ डिसेंबर २०१६ मध्ये हा नोड महापालिकेकडे हस्तांतर करण्यात आला. यामुळे या परिसरातील पायाभूत सुविधांची जबाबदारीही महापालिकेवर आली आहे. घणसोली ते ऐरोली दरम्यान १.९५ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल बांधणे आवश्यक आहे. हे काम रखडल्यामुळे नागरिकांना ठाणे व मुलुंडला जाण्यासाठी ठाणे-बेलापूर रोडवरून वळसा घालून जावे लागत आहे. चार ते पाच किलोमीटरचा प्रवास वाढत आहे. महापालिकेने पामबीच रोडवर केबल स्टे ब्रीज बांधण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती केली होती. या पुलासाठी जवळपास ८०० कोटी रुपये खर्च लागणार असल्यामुळे तो प्रकल्प रद्द करण्यात आला. केबल स्टेऐवजी सर्वसाधारणत: बांधतात, त्या पद्धतीने उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मार्गामध्ये खारफुटी असल्यामुळे वन व पर्यावरण विभागाची परवानगी घ्यावी लागणार आहे. पालिकेने त्यांच्या पॅनेलवरील सल्लागाराकडून ढोबळ अंदाजपत्रक तयार केले आहे. साधारणत: २९८ कोटी ९९ लाख रुपये खर्च अपेक्षित असून, या प्रस्तावास प्रशासकीय मंजुरी देण्याचा प्रस्ताव जानेवारी महिन्यामधील विशेष सर्वसाधारण सभेत सादर करण्यात आला होता.पामबीच रोडवर पूल बांधण्यासाठी सिडकोनेही निधी द्यावा, यासाठी महापालिकेने पाठपुरावा सुरू केला आहे. १५जुलै २०१९ मध्ये याविषयी बैठकही झाली होती. त्या बैठकीमध्ये ५० टक्के खर्च देण्यास सिडको प्रशासनाने सहमती दर्शविली होती. काम सुरू झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने हा निधी दिला जाणार होता; परंतु दोन दिवसांपूर्वी सिडकोने महापालिका प्रशासनाला पत्र देऊन या पुलाच्या कामासाठी १२५ कोटी रुपयेच देण्याची तयारी दर्शविली असून ही रक्कमही काम पूर्ण झाल्यानंतर देण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. यामुळे शहर अभियंता सुरेंद्र पाटील यांनी सर्वसाधारण सभेत प्रस्ताव मागे घेत असल्याचे सांगितले.पाठपुरावा करण्याची भूमिकासर्वसाधारण सभेमध्ये खाडीपुलाच्या प्रस्तावावर चर्चा करताना विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी हा प्रस्ताव मार्गी लावणे आवश्यक असल्याचे सांगितले. सिडकोकडून निधी मिळावा, यासाठी नगररचना विभागाकडे पाठपुरावा करू, महापालिकेने त्यासाठी पत्र द्यावे, अशी भूमिका मांडली. महापौर जयंवत सुतार यांनीही सिडकोकडून येणाऱ्या निधीचा प्रश्न मार्गी लागल्यास प्रस्ताव पुन्हा सभागृहात घेता येईल, असे सांगितले.घणसोली ते ऐरोली दरम्यान खाडीपूल बांधण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. यासाठी लागणारा ५० टक्के खर्च सिडको देणार होती. टप्प्याटप्प्याने हा निधी येणार होता; परंतु सिडकोने पत्र देऊन १२५ कोटी रुपये देण्याचीच तयारी दर्शविली असून हा निधीही काम पूर्ण झाल्यानंतर देणार आहेत. यामुळे सद्यस्थितीमध्ये हा प्रस्ताव मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.- सुरेंद्र पाटील, शहर अभियंता, महापालिका

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई