रेस्टॉरंट मालकांसमोर झोमॅटोची शरणागती; किमतीच्या वादाने अनेक रेस्टॉरंट लॉगआउट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2019 02:03 IST2019-08-22T01:57:06+5:302019-08-22T02:03:47+5:30
हे प्रकरण फारच वाढत असल्याचे पाहून आपल्या चुका सुधारण्यास आपण तयार असल्याचे झोमॅटोने जाहीर केले. अनेक रेस्टॉरंट झोमॅटोमधून लॉगआऊट होत असल्याचे पाहून झोमॅटोला जाग आली.

रेस्टॉरंट मालकांसमोर झोमॅटोची शरणागती; किमतीच्या वादाने अनेक रेस्टॉरंट लॉगआउट
नवी दिल्ली : आॅनलाइन घरपोच खाद्य पुरवठादार प्लॅटफॉर्म आणि रेस्टॉरंट मालक यांच्यातील संघर्षात झोमॅटो प्लॅटफॉर्मने नांगी टाकली आहे. खाद्यपदार्थांच्या किमतीवर किती सवलत द्यायची हे झोमॅटोच ठरवू लागल्याने रेस्टॉरंट मालक चिडले होते. घरपोच खाद्यपदार्थांवर फारच सवलती दिल्या जाऊ लागल्याने रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांचे येणे कमी होत असून, त्याचा आम्हाला फटका बसत आहे, अशी मालकांची तक्रार आहे.
हे प्रकरण फारच वाढत असल्याचे पाहून आपल्या चुका सुधारण्यास आपण तयार असल्याचे झोमॅटोने जाहीर केले. अनेक रेस्टॉरंट झोमॅटोमधून लॉगआऊट होत असल्याचे पाहून झोमॅटोला जाग आली. लॉगिंग आउट मोहिमेत देशभरातील १,२०० रेस्टॉरंट या घरपोच खाद्यपदार्थ पोहोचविणाऱ्या झोमॅटोसारख्या प्लॅटफॉर्मपासून दूर झाले आहेत.
प्लॅटफॉर्मच्या सवलतीमुळे टेबल आरक्षण सेवेवर परिणाम होत असल्याचे रेस्टॉरंट्सचे म्हणणे आहे. ‘झोमॅटो गोल्ड’मधील ६५ मोठ्या रेस्टॉरंटनी झोमाटोला सोडचिठ्ठी दिली. झोमाटोच्या उपक्रमात या रेस्टॉरंटांचा वाटा १ टक्का होता.
नोकºयाही धोक्यात
या ‘लॉगिंग आउट’ मोहिमेत दिल्ली, मुंबई, बंगळुरू, कोलकता, गोवा,
पुणे, गुरगाव व बडोदा येथील रेस्टॉरंटमालक सहभागी झाले. एकट्या झोमॅटोमध्ये ५ हजार कर्मचारी आहेत, तर अन्य आॅनलाइन कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांची संख्या दोन हजारांवर आहे. मात्र, रेस्टॉरंटच त्यांच्या योजनेतून
बाहेर पडल्यास यांच्या नोकºया जाऊ शकतील.