शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
3
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
6
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
7
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
8
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
9
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
10
६ मिनिटं वाचन केल्याने ६८% नी मानसिक तणाव कमी होतो, पण वाचनाची आवड लावायची कशी?
11
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
12
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
13
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
14
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
15
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
16
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
17
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
18
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
19
कोण आहे सीताराम बाबा? ज्यांनी भाजपा आमदाराला जोरजोरात ठोसे मारले अन् ढकलून दिलं, Video व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. तील पदांसाठी नेत्यांकडे साकडे इच्छुकांच्या भेटीगाठी : भाजपा बदल करेल, तर सेनाही करेल

By admin | Updated: October 28, 2015 23:54 IST

जळगाव- जिल्हा परिषदेत अध्यक्ष, उपाध्यक्ष, बाल कल्याण व शिक्षण समिती सभापती या पदांसाठी इच्छुक असलेल्या सदस्यांनी आपापल्या नेत्यांशी प्राथमिक चर्चा केली आहे.

जळगाव- जिल्हा परिषदेत अध्यक्ष, उपाध्यक्ष, बाल कल्याण व शिक्षण समिती सभापती या पदांसाठी इच्छुक असलेल्या सदस्यांनी आपापल्या नेत्यांशी प्राथमिक चर्चा केली आहे. यात भाजपाने आपले पदाधिकारी बदलले तर शिवसेनाही बदल करेल, असे सेनेतील मंडळींनी म्हटले आहे. अडीच वर्षाच्या दुसर्‍या कार्यकाळासाठी पदाधिकारी नियुक्त करताना अनेक इच्छुक नाराज झाले होते. त्यांना सव्वा वर्षानंतर संधी देण्याचे आश्वासन नेत्यांनी दिले होते. या आश्वासनांची आठवण आता इच्छुक आपापल्या नेत्यांना, समर्थकांनाही करून देत आहेत. अर्थातच सव्वा वर्षाचा कालावधी संपण्यात काही दिवस राहिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर इच्छुकांनी पदांसाठी नेत्यांना साकडे घातले आहे. अध्यक्षपदासाठी धरणगाव तालुक्यातील शोभा मालचे यांचे नाव आहे. मालचे यांच्यातर्फे पी.सी.पाटील यांनी आपल्या नेत्यांशी चर्चा केली आहे. उपाध्यक्षपदासाठी इंदिराताई पाटील या प्रमुख दावेदार आहे. इंदिराताई यांनी माजी मंत्री सुरेशदादा जैन, आमदार गुलाबराव पाटील, माजी आमदार चिमणराव पाटील यांच्याकडे आपली भूमिका मांडणार आहे. शिक्षण समिती सभापतीपदासाठी बोदवडमधील प्रतिभा राणे यांचे नाव पुढे आघाडीवर आहे. त्या महसूलमंत्र्यांचे समर्थक मधुकर राणे यांची पत्नी आहे. बाल कल्याण समितीसाठी मुक्ताईनगरमधील रुपाली चोपडे, धरणगावच्या छाया पाटील यांची नावे चर्चेत आहेत. सेनेत सर्व पदाधिकारी मिळून जि.प.तील पदांबाबत निर्णय घेतील. पदांसाठी इच्छुक असतात. चर्चेनंतर विविध पदांच्या बदलाबाबत अंतिम विषय ठरेल. अजून कुणाचे नाव पुढे आहे हे सांगता येणार नाही. -आमदार गुलाबराव पाटील, उपनेते, शिवसेनाधरणगाव तालुक्यातील कधीही जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळालेले नाही. आमच्या पक्षाचे नेते महसूलमंत्री एकनाथराव खडसे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन व इतर वरिष्ठांकडे आमच्या तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची भूमिका मांडेल. -पी.सी.पाटील, जि.प.चे माजी सभापती