शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

माणुसकीला काळीमा...! दोन भावांच्या वादात 2 दिवसांपासून अंत्यसंस्काराची वाट पाहत होता वडिलांचा मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2021 00:09 IST

येथील गृहनिर्माणातील घर क्रमांक-346/2 मध्ये राहणाऱ्या रामौतार प्रजापती यांनी कधी स्वप्नातही विचार केला नसेल, की जे घर त्यांनी एवढ्या कष्टाने उभे केले, त्याच घराच्या दरवाजावर त्यांचा मृतदेह ठेऊन मुलं भांडत बसतील.

मैनपुरी - उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यातून माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. येथील गृहनिर्माणातील घर क्रमांक-346/2 मध्ये राहणाऱ्या रामौतार प्रजापती यांनी कधी स्वप्नातही विचार केला नसेल, की जे घर त्यांनी एवढ्या कष्टाने उभे केले, त्याच घराच्या दरवाजावर त्यांचा मृतदेह ठेऊन मुलं भांडत बसतील. हे प्रकरण आहे, वडिलांच्या मृत्यूनंतर झालेल्या दोन भावांतील संपत्तीच्या वादाचे. (Youths body was yearning for funeral in property dispute in mainpuri)

रामौतार यांचा छोटा मुलगा मनमोहन याने आपला मोठा भाऊ सुरेंद्र याच्यावर आरोप केला आहे, की त्याने 5 दिवसांपूर्वीच वडिलांकडून संपत्ती स्वतःच्या नावावर करून घेतली आणि 17 जूनच्या रात्री 1 वाजताच्या सुमारास वडिलांची गळा दाबून हत्या केली. 

पोलिसांकडून मृतदेहाचे शवविच्छेदन - तक्रारीनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन केले. यात श्वास नलिकेत संसर्ग झाल्याने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यानंतर ताब्यात घेतलेल्या मोठ्या मुलाला पोलिसांनी सोडले आहे. तर, कुटुंबातील इतर सदस्यांनी आरोप केला आहे, की सुरेंद्र एलआयसी (LIC) एजंट आहे आणि त्याने एक माहिन्यापूर्वीच अपल्या वडिलांचा 50 लाख रुपयांचा विमा केला होता. यात तो स्वतःच नॉमिनी आहे. 5 दिवसांपूर्वीच वडिलांकडून आपल्या नावे करून घेतलेल्या संपत्तीत तो स्वतःच वारस आहे. तसेच, इतर सम्पत्तीतही तो बरोबरीचा वाटेकरी आहे. 

यावेळी कुटुंबातील इतर काही सदस्य रामौतार प्रजापति यांचे पुन्हा शवविच्छेदन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना भेटायचे म्हणत होते. मात्र, पोलिसांनी समजावल्यानंतर रविवारी सायंकाळी रामौतार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रामौतार हे अॅग्रीकल्चर विभागात सरकारी कर्मचारी होते. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसDeathमृत्यूhospitalहॉस्पिटल